‘बाहुबली’ या चित्रपटानंतर अभिनेता प्रभासच्या स्टारडममध्ये जी वाढ झाली, ते काही नव्याने सांगायला नको. प्रभासचा लूक आणि त्याची शरीरयष्टी पाहून अनेकजण जणू त्याच्या प्रेमातच पडले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच तो देशभरातील चाहत्यांसाठी जणू मेगास्टार बनला आहे. अशा या ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभासच्या लग्नाविषयीसुद्धा बऱ्याच चर्चा ऐकायला मिळाल्या. प्रभासचे अनेक चाहते त्याच्या लग्नाच्या बातमीकडे डोळे लावून बसले आहेत. टॉलिवूडच्या या हॅण्डसम हंकसोबत लग्न करणारी ती नशीबवान मुलगी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या नावाची चर्चा होती. अनुष्का आणि प्रभास एकमेकांना डेट करत असून हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, आता चर्चा काही वेगळीच आहे. साऊथचा मेगास्टार चिरंजीवी यांची पुतणी निहारिका हिच्यासोबत प्रभास लग्न करणार असल्याची खबर आहे.

वाचा : ऋताच्या चाहत्यांना जाणून घ्यायला मिळाली तिची आवड-निवड

निहारिका ही तेलुगू अभिनेत्री आहे. २०१५ मध्ये ‘ओका मनसू’ या चित्रपटाद्वारे तिने पदार्पण केलं होतं. प्रभास व निहारिका यांच्या लग्नाची बोलणी सुरू असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. अर्थात चिरंजीवी यांनी ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे.

प्रभासच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, तो सध्या त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये श्रद्धा कपूर त्याच्यासोबत भूमिका साकारणार आहे.