‘इस प्यार को क्या नाम दू’, या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री दिपाली पानसरे सध्या चर्चेत आली आहे ते म्हणजे तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे. दिपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या मुलासोबतचा सुपरक्यूट सेल्फी पोस्ट केला आहे. मे महिन्यात दिपालीच्या मुलाचा जन्म झाला. रुआनच्या जन्मानंतर तिच्या कुटुंबाचा त्रिकोण पूर्ण झाला असून, दिपाली फारच आनंदात आहे.

तिने सध्या पोस्ट केलेल्या सेल्फीला भलंमोठं कॅप्शन न देता फक्त ‘माय हार्ट’, असंच लिहिलं आहे. आपल्या मुलावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी दिपालीने दिलेलं हे कॅप्शनही अनेकांचीच मनं जिंकत आहे. दिपालीचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहता सध्या ती आयुष्यातील या पर्वाचा आनंद घेतेय याचाच प्रत्यय येतोय. मालिका विश्वात बरीच प्रसिद्धी मिळवणारी दिपाली गेल्या काही दिवसांपासून मात्र प्रेक्षकांपासून दूर गेली होती.

https://www.instagram.com/p/BYWYr_Ij6OX/

https://www.instagram.com/p/BXbUz8xDPLT/

वाचा : माहेरचा गणपती : चैतन्य, भरभराट आणि उत्साहाची उधळण करणारा माझा नवसाचा बाप्पा- अक्षया गुरव

मालिकांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत नसली तरीही सोशल मीडियावरुन मात्र तिने चाहत्यांची भेट घेणं काही कमी केलं नव्हतं.
येत्या काही दिवसांमध्ये दीपाली पुन्हा एकदा टेलिव्हीजन विश्वात परतणार असल्याच्या चर्चा आहेत. तेव्हा आता इतक्या साऱ्या मालिकांच्या गर्दीत तिच्या वाट्याला नेमकी कोणती मालिका येते हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.