बॉलिवूडचा किंग शाहरुख खान सध्या जब हॅरी मेट सेजलच्या प्रमोशनमध्ये भलताच व्यग्र आहे. कदाचित याच प्रमोशनमुळे त्याला आयफा २०१७ च्या सोहळ्यालाही जाता आले नाही. वेगवेगळ्या शहरांमध्ये तो सिनेमाचे जोरदार प्रमोशन करतोय. सध्या जोधपूर आणि जयपूरच्या दौऱ्यावर असून त्याच्या या दौऱ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कधी त्याच्या नेहमीच्या पोशाखात तर कधी स्थानिक पोशाखात तो त्याच्या चाहत्यांची मनं जिंकतच चालला आहे.

आयफामध्ये या कलाकारांनी उमटवली पुरस्कारांवर मोहर

पण राजस्थानी पोशाखातला त्याचा हा अनोखा अंदाज त्याच्या चाहत्यांना भलताच आवडला आहे. त्याने फक्त राजस्थानी पगडीच घातली नाही तर सोन्याच्या ताटातून त्याने राजस्थानी पदार्थांचा आस्वादही घेतला. पाहुणचार म्हणून त्याला महाराजा थाळी वाढण्यात आली होती. या थाळीची किंमत ऐकून तुम्ही तोंडात बोटं नाही घातली तरच नवल… सोन्याच्या या थाळीची किंमत चक्क दहा हजार रुपये इतकी आहे.

shah-rukh-2-1

राजस्थान दौऱ्यामध्ये असताना डोक्यावर राजस्थानी फेटा हातात तलवार घेतलेल्या शाहरुखचे अगदी महाराजा अंदाजात स्वागत करण्यात आले.अनोख्या रुबाबात बसलेला शाहरुख जेवणाचं ताट समोर येताच त्याकडेही उत्सुकतेने पाहताना दिसतो. त्याने पहिल्यांदाच राजस्थानी थाळीची खासियत असलेले दाल-बाटी आणि चुरमाची या पदार्थांची चव चाखली.

shah-rukh-1-1

शाहरूखला तब्बल १४ वाट्यांमध्ये राजस्थानी खाद्यपदार्थ वाढले होते. शाहरूखनेही मोठ्या चवीने दोन वाट्यांमधील पदार्थांची चव चाखली. याव्यतिरिक्त त्याने जोधपुरी गट्टेची भाजी, कॅर सांगरी, बेसनचा चुरमा, प्लेन चुरमा कढी, घेवर, मालपोवा, केसरची खीर आणि राजस्थानी पापडाचीही चव चाखली.

shah-rukh-3

अंतर्मुख करायला लावणारा कच्चा लिंबूचा ब्लॅक अॅण्ड व्हाईट ट्रेलर प्रदर्शित

‘जब हॅरी मेट सेजल’ सिनेमाची आतापर्यंत चार गाणी प्रदर्शित झाली असून अनेक मिनी ट्रेलरही प्रदर्शित झाले आहेत. सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरुख नेहमीच वेगवेगळे फंडे वापरताना दिसतो. सिनेमाचा एकच ट्रेलर प्रदर्शित न करता त्याने छोटेखानी असे सहा ट्रेलर प्रदर्शित केले. त्यामुळे सिनेमाबद्दलची चांगलीच उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात तयार झाली.

shah-rukh-4