परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्राची जोडी पुन्हा एकदा ‘जबरियाँ जो़डी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याचीच जोरदार चर्चा आहे. एका सरप्राइज लग्नाची गोष्ट या चित्रपटातून सांगितली जाणार आहे.

यामध्ये सिद्धार्थच्या भूमिकेचं नाव अभय तर परिणीतीच्या भूमिकेचं नाव बबली असं आहे. बिहारी बाबूची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थने ट्विटरवर फर्स्ट लूक शेअर करताना लिहिलं की, ‘सरप्राइज पार्टी सुने हो?..ये सरप्राइज शादी है!’ पोस्टर आणि एकंदरीत दोघांचा लूक पाहून ही कथा नक्कीच रंजक असणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

bse sensex falls 188 59 points to settle at 74482 78
निफ्टी’ची ऐतिहासिक उच्चांकी झेप, मात्र नफावसुलीने सत्राअंती घसरण! ‘सेन्सेक्स’ही ७५ हजाराला स्पर्श करून माघारी
Radio images of the Sun obtained by scientists pune news
शास्त्रज्ञांनी मिळवली सूर्याच्या रेडिओ प्रतिमा
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी

वाचा : विनोदवीर भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे पहिल्यांदाच एकत्र झळकणार चित्रपटात 

प्रशांत सिंद दिग्दर्शत ‘जबरियाँ जोडी’ या चित्रपटाचे बालाजी टेलिफिल्म्स आणि कर्मा मिडिया एंटरटेन्मेंट सह- प्रस्तुतकर्ते आहे. याआधी २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हसी तो फंसी’ या चित्रपटात सिद्धार्थ- परिणीतीने एकत्र काम केलं होतं. ही जोडी तेव्हाही प्रेक्षकांना खूप आवडली होती. तेव्हा आणखी एक अनोखी कथा घेऊन पुन्हा एकत्र येणाऱ्या या जोडीचा हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत आवडतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.