सलमान खान बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. काही जण त्याला बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणतात, तर काही जण ‘सल्लू’. पण तुम्हाला माहिती आहे का सलमानचं सल्लू हे नाव कोणी ठेवलं? नाही? तर मग हा व्हिडीओ पाहा. या व्हिडीओमध्ये स्वत: सलमानने आपल्या सल्लू या नावाचा गंमतीशीर किस्सा सांगितला आहे.
अवश्य पाहा – “तुम्हीही सोडून गेलात?”; जगदीप यांच्या निधनामुळे ‘शोले’मधील अभिनेत्याला मानसिक धक्का
अवश्य पाहा – उज्जैन पोलिसांकडून विकास दुबेला अटक; नेटकऱ्यांनी Memes मधून घेतली UP पोलिसांची फिरकी
सलमानला अभिनेता जॅकी श्रॉफ याने पहिल्यांदा सल्लू म्हणून हाक मारली होती. जॅकी आणि सलमान खूप चांगले मित्र आहेत. सुरुवातील जॅकी सलमानला प्रेमाने सल्लू म्हणून हाक मारायचा. ही हाक आसपासचे अनेक लोक ऐकायचे अन् ते देखील तशीच हाक मारायचे. आता तर हा शब्द इतका प्रसिद्ध झाला आहे की चाहते देखील त्याला प्रेमाने सल्लू म्हणूनच हाक मारतात. जॅकी श्रॉफ काही वेळेस त्याला सल्ले म्हणून देखील हाक मारायचा.
सलमान खानचा हा गंमतीशीर व्हिडीओ फिल्मीज्ञान या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक जण सल्लू नावाचा हा किस्सा ऐकून चकित झाले आहेत.