बॉलिवूडचा भिडू म्हणजेच अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफने देखील बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण केलंय. असं असलं तरी आजही जॅकी श्रॉफ यांचा मोठा चाहता वर्ग आहे. जॅकी श्रॉफ लवकरच ‘द इंटरव्यू: नाइट ऑफ २६/११’ झळकणार आहेत. या सिनेमात ते एका पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहेत.
या सिनेमाच्या निमित्ताने जॅकी श्रॉफ यांनी नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या भूमिकेचा खुलासा केलाय. यावेळी त्यांनी टायगरचं देखील कौतुक केलंय. या सिनेमातील किस सीनवर विचारलेल्या एका प्रश्वावर जॅक श्रॉफ यांनी त्यांच्या बिनधास्त अंदाजात उत्तर दिलं आहे. या सिनेमात जॅकी श्रॉफ यांचा एक किसिंग सीन आहे. ‘एकीकडे टायगर श्रॉफ त्याच्या स्टंटसाठी ओळखला जातो दुसरीकडे तुम्ही या सिनेमात किस सीन दिला आहे. हा सीन देताना थोडा संकोट वाटला का?’ असा प्रश्न जॅकी श्रॉफ यांना विचारण्यात आला होता. यावर दिलखुलास अंदाजात उत्तर देत ते म्हणाले, “मुलगा टायगर हिरो झाला म्हणून मी किसिंग सीन करायचे नाही का?” असं जॅकी श्रॉफ म्हणाले.
View this post on Instagram
पुढे ते म्हणाले, “हा सीन करताना मला अजिबात संकोच वाटला नाही. माझा मुलगा तरुण झालाय हा विचार करून मी वेगळ्या भूमिका करणं साडू शकत नाही. आम्ही एकमेकांचे स्पर्धक आहोतच. त्याने इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं आहे. स्वत:च स्थान निर्माण केलंय. आता मला टायगर श्रॉफचे वडील म्हणून ओळखलं जातं ही गोष्टचं निराळी आहे. मला त्याच्यापासून प्रेरणा मिळते आणि त्यालाही आपले वडील आजही उत्सूर्तपणे काम करतात याचा अभिमान आहे.” असं जॅकी श्रॉफ म्हणाले.
जॅकी श्रॉफ यांचा लवकरच ‘द इंटरव्यू: नाइट ऑफ 26/11’ हा सिनेमा ९ सप्टेंबरला अॅमेझान प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.