गेल्या अनेक दिवसांपासून टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. टायगर आणि दिशा नेहमी एकत्र दिसतात. या दोघांनी कधीही उघडपणे कबूल केले नाही की दोघे एकमेकांना डेट करत आहेत. आता टायगरचे वडील आणि बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आणि टायगरची बहीण कृष्णा श्रॉफने टायगर आणि दिशाच्या नात्यावर वक्तव्य केलं आहे.
जॅकी श्रॉफने ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी टायगर आणि दिशाच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं आहे. माझा मुलगा २५ वर्षांचा असताना रिलेशनशिपमध्ये आहे आणि ते खूप चांगले मित्र आहेत. मला माहित नाही की त्या दोघांनी भविष्यासाठी काय विचार केला आहे परंतु मला एक गोष्ट माहित आहे की टायगरचा पूर्ण फोकस हा त्याच्या कामावर आहे. माझ्यासाठी त्याचे काम सगळ्यात वर आहे आणि त्याची आई, बहीण किंवा त्याची मैत्रीण त्याच्या करिअरच्या मध्ये येत नाही. त्याच्या करिअरमध्ये काही येऊ शकतं नाही. त्याच्या कामावर तो फोकस्ड आहे आणि ही चांगली गोष्ट आहे,” असे जॅकी म्हणाले.
आणखी वाचा : इंडियन आयडल १२ : ‘या’ दोन गायकांना हिमेश रेशमीयाने दिली म्युझिक अल्बममध्ये संधी
तर टायगरची बहीण कृष्णा म्हणाली, “मी माझ्या भावाच्या बाबतीत प्रोटेक्टिव आहे पण शेवटी तो मोठा आहे. मला माहित आहे की त्याच्यासाठी काय बरोबर आणि काय नाही याची कल्पना त्याला आहे. तो खूप हुशार आहे आणि त्याच्या आनंदात आम्हीही आनंदी आहोत. मला माझ्या भावाला काही सल्ला देण्याची गरज वाटत नाही.”
View this post on Instagram
आणखी वाचा : सलमान, अक्षय नंतर आता केआरकेचा विद्या बालनशी पंगा, म्हणाला..
या मुलाखतीत जॅकी किंवा कृष्णाने दिशाचे नाव घेतले नाही. काही दिवसांपूर्वी दिशाने तिचा वाढदिवस टायगर आणि त्याची बहीण कृष्णा सोबतही साजरा केला होता. दिशाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीत वाढदिवस कसा साजरा केला त्याची एक झलकही शेअर केली होती. तर, टायगरची आई आयशा श्रॉफनेही दिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.