बॉलिवूडमधील सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिसचे नाव नक्कीच घेतले जाते. जॅकलिन तिच्या सिनेमांमुळेच नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. दिग्दर्शक साजिद खान आणि तिच्या अफेअरबद्दल तर साऱ्यांनाच माहिती आहे. सध्या तिचे नाव अ जेंटलमन सिनेमातील को-स्टार सिद्धार्थ मल्होत्रासोबत जोडले गेले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की जॅकलिनने बहारिनचा राजकुमार शेख हसनलाही डेट केले आहे.

जॅकलिन आणि शेख हसन हे जवळपास दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. हसनशी तिची पहिली ओळख एका पार्टीत झाली होती. त्यावेळी हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. पण २०११ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. असे म्हटले जाते की, साजिद खान आणि जॅकलिनमध्ये वाढत्या जवळीकीमुळे हसन आणि तिच्यात दुरावा वाढत गेला आणि त्यांचे ब्रेकअप झाले.

जॅकलिन आणि शेख हसनचे बीचवरील काही फोटो व्हायरलही झाले होते.

‘हाऊसफुल्ल’ सिनेमानंतर जॅकलिन आणि साजिद यांच्यात अफेअरला सुरूवात झाली होती. याबद्दल बहारिनच्या राजकुमाराला कळले होते. साजिदमुळे दोघांमध्ये अनेक वादही व्हायचे. शेवटी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

शेख हसन यांच्या ब्रेकअपनंतर जॅकलिन आणि साजिद यांचे रिलेशन सुरू झाले. पण दुर्दैवाने हे नातेही फार काळ टिकू शकले नाही. करिअरमध्ये सलमान खानचा हात मिळाल्यावर साजिद आणि तिच्या नात्यात दुरावा येऊ लागला. शेवटी २०१३ मध्ये साजिद आणि जॅकलिन यांचे ब्रेकअप झाले.

गेल्यावर्षी ‘ढिशूम’ सिनेमाच्या चित्रीकरणावेळी जॅकलिन आणि शेख हसन हे पुन्हा एकदा एकत्र आल्याचे म्हटले जात होते. या सिनेमात जॅकलिनसोबत जॉन अब्राहम आणि वरुण धवन होते.

जॅकलिनने २००६ मध्ये श्रीलंका-युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. तसेच वयाच्या १४ व्या वर्षी तिने बहरिनमधील एक टीव्ही शोचे सूत्रसंचालनही केले होते.

जॅकलिनने २००९ मध्ये अलादीन सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती ‘मर्डर २’, ‘हाऊसफुल २’, ‘रेस २’, ‘किक’ आणि ‘फ्लाइंग जट’ या सिनेमांमध्ये दिसली. सिनेमांव्यतिरिक्त जॅकलिन ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोची परीक्षकही होती.