अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जॅकलिन ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. गेल्या अनेक दिवसांपासून जॅकलिन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. आता जॅकलिन एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.

जॅकलिनचा हा फोटो बॉलिवूडचा सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी याने काढला आहे. अनेक अभिनेत्री डब्बू रतानानीच्या फोटो शूटमुळे चर्चेत येतात. त्याच कारण म्हणजे त्यांचे टॉपलेस फोटो आहे. यावेळी जॅकलिनने देखील टॉपलेस फोटो काढला आहे. या फोटोत जॅकलिनचा हॉट आणि बोल्ड अंदाज दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘रोज सकाळी लवकर उठा. कारण जेव्हा इतर स्वप्न बघत असतील तेव्हा तुम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्ग शोधत असाल,’ अशा आशयाचे कॅप्शन डब्बू रतनानीने दिले आहे.

आणखी वाचा : ‘तुम्हाला लाज नाही वाटली का?’; शो मध्ये बोलवून शगुफ्ता अलींना मदत केल्यामुळे नेटकरी संतापले

आणखी वाचा : तैमूरच्या छोट्या भावाच नावं आहे ‘जेह’, जाणून घ्या नावाचा अर्थ

दरम्यान, जॅकलीन नुकतीच रॅपर बादशहाच्या गाण्यात झळकली होती. ‘पानी पानी’ हे बादशाहचं गाणं चांगलच हिट झाल आहे. या गाण्यातील जॅकलीनच्या अदांवर चाहते घायाळ झाले आहेत. तर या आधी देखील बादशहा आणि जॅकलीनच्या ‘गेंदा फूल’ या अल्बमला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती. लवकरच जॅकलिन ‘भूत पोलिस’ या चित्रपटातून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.

Story img Loader