बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असल्याचे दिसते. नुकताच जान्हवीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जान्हवी आणि तिचे मित्र-मैत्रिणी दिसत आहेत. जान्हवी सीन पॉलच्या टेंपरेचर या गाण्यावर डान्स करताना दिसतं आहे. हा व्हिडीओ शेअर करत “अक्सा गॅंग परत आली आहे,” असे कॅप्शन जान्हवीने दिले आहे.

आणखी वाचा : ‘त्या’ चित्रपटामुळे एक एक सामान विकावे लागले होते, जमिनीवर झोपायची आली होती वेळ – जॅकी श्रॉफ

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील नवीन सोनू कोणाला आवडत नव्हती, गोलीने केला खुलासा

जान्हवीच्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. तर, जान्हवीचा सावत्र भाऊ अर्जुन कपूरने देखील कमेंट केली आहे. यावर चर्चा करण्यासाठी रात्रीच्या जेवणाची गरज आहे, अशी कमेंट अर्जुनने केली आहे.

आणखी वाचा : ‘राजू’ सोबत झळकणार ‘श्याम’चा मुलगा, अहान शेट्टी करणार अक्षयसोबत काम!

दरम्यान, जान्हवी लवकरच ‘दोस्ताना 2’, ‘गुड लक जेरी’, ‘तख्त’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे. जान्हवीचा ‘रुही’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा देखील होते. या चित्रपटातील जान्हवीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तर नेटकऱ्यांनी जान्हवीच्या अभिनयाचे कौतुक केले.

Story img Loader