अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या खासगी आयुष्याबाबत फारसं मोकळेपणाने बोलताना दिसत नाही. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने एक खुलासा केला. वडील बोनी कपूर यांच्याशी खोटं बोलून लास वेगासला फिरायला गेल्याचा खुलासा जान्हवीने केला. चित्रपट पाहायला जात असल्याचं कारण सांगत ती फिरायला गेली होती.
“मी विमानाने लॉस एंजिलिसवरून लास वेगासला गेले. तिथे संपूर्ण दिवस फिरत बसले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत आले”, असं तिने सांगितलं. करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या चॅट शोमध्ये तिने हजेरी लावली होती. यावेळी तिने हा किस्सा सांगितला. ही घटना जरी खूप जुनी असली तरी तिने खोटं बोलल्याची कबुली वडिलांसमोर नुकतंच काही दिवसांपूर्वी दिली होती.
View this post on Instagram
जान्हवी सध्या तिच्या आगामी ‘गुडलक जेरी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. पंजाबमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. सिद्धार्थ सेनगुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात दीपक डोब्रियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जान्हवीचा ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.