तुम्हाला २००८ मध्ये ‘जय श्री कृष्ण’ या मालिकेत काम करणारा तो छोटा कृष्ण आठवतोय का? या बाळकृष्णाने तेव्हा साऱ्यांनाच वेड लावले होते. बाळकृष्ण कुठेही गेला तरी त्याच्या मागे त्याचे चाहते गराडा घालायचेच. पण आता हे बाळ मोठं झालं आहे. ‘जय श्री कृष्ण’ मालिका बघताना अनेकांना तो मुलगाच आहे असे वाटत होते पण मुळात तो मुलगा नसून एक मुलगी होती. धृती भाटिया असे या बालकलाकाराचे नाव
धृती आता ११ वर्षांची झालीये. जेव्हा तिने श्रीकृष्णाची भूमिका साकारली तेव्हा ती फक्त अडीज वर्षांची होती. ती कुठेही बाहेर गेले की लोकांना श्रीकृष्ण आला असेच वाटायचे. हे आम्ही नाही तर खुद्द धृतीने एका मुलाखतीत सांगितले आहे.

Virat Kohli is Damaad Of Shahrukh Khan
“विराट कोहली आमचा जावई, पण वाईट वाटतं की..”, शाहरुख खानने सांगितलं नातं, म्हणाला, “बाकी खेळाडूंपेक्षा त्याला…”
randeep hooda veer savarkar marathi news
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपट अवघड का होता? रणदीप हुडा यांनी सांगितले कारण…
sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”

धृति म्हणते की, त्या मालिकेवेळी मी फार लहान होते. पण मालिका करताना लोकं मला भेटण्यासाठी अगदी भक्ती भावाने यायचे. एवढंच नाही तर ते मला श्रीकृष्णच मानायचे आणि तसे वागवायचे. या मालिकेमुळे मला फक्त प्रसिद्धीची मिळाली असे नाही तर ही मालिका मला सकारात्मकताही देऊन गेली.

ही मालिका संपून आता ८ वर्षे लोटली पण त्या मालिकेची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कमी झालेली नाही. मी आजही इस्कॉन मंदिरात जाते. आठवड्यातून एकदा तरी मी भगवान कृष्णाच्या मंदिरात जाऊन आशिर्वाद घेते, असं सांगायला धृती विसरली नाही.

भविष्यात करिअरमध्ये काय करायचं आहे असा प्रश्न जेव्हा धृतीला विचारण्यात आला तेव्हा थोडाही वेळ न दडवता तिने तिला नृत्य दिग्दर्शक व्हायचे आहे असे सांगितले. धृतीची आई स्वतः नृत्यदिग्दर्शिका असल्यामुळे तिलाही आपल्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवायचंय. सध्या सहावीत शिकणाऱ्या धृतीला नृत्याव्यतिरिक्त फोटोग्राफी आणि पेन्टिंगचीदेखील आवड आहे. सध्या ती शास्त्रीय नृत्य शिकतेय. धृतीचे वडील गगन भाटिया हे उद्योगपती असून आई पूनम कोरियोग्राफर आहे.