सुपरहिरो शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही काळात ते देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर सातत्याने टीका करत आहेत. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या ७० वर्षांपासून देशात हेच सुरु आहे त्यावेळी नेहरूंनी शहरीकरणाला महत्व दिलं नसतं तर आज देशाची ही अवस्था नसती अशी टोला त्यांनी लगावला आहे.

अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा बिकिनी अवतार; हॉट फोटोशूटमुळे चाहते अवाक

मुकेश खन्ना यांनी एका युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. ते म्हणाले, “लोकांना वाटतं मी भाजपा पाठिंबा देतोय पण हे खोटं आहे. मी कायम शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे. जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आजतागायत शेतकऱ्यांच्या त्याच समस्या आहेत. गेल्या ७० वर्षात शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली नाही. अन् याला आपल्या देशाचं धोरण आहे. ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी जवाहरलाल नेहरूंनी शहरीकरणाला प्राधान्य दिलं. त्याऐवजी त्यांनी खेड्यांना सक्षम केलं असतं तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. देशातील ७५ टक्के भाग खेडी आणि गावांनी व्यापला आहे. आपण त्यांच्या विकास करायला हवा.” अशा आशयाची वक्तव्य त्यांनी या व्हिडीओमध्ये केली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

अवश्य पाहा – आकाशातील परी जमिनीवर…; सुरभीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते अवाक

अवश्य पाहा – केला कहर अन् झाले ट्रोल; २०२०मध्ये सर्वाधिक टीका झालेले सेलिब्रिटी

महाराष्ट्रातून ४ हजार शेतकरी बाईक रॅलीने गाठणार दिल्ली

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी महाराष्ट्रातून सुमारे ४ हजार शेतकरी बाईक रॅलीद्वारे दिल्लीला जाणार आहेत. नाशिक ते दिल्ली असा हा दुचाकी मोर्चा असणार आहे. राजधानी दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील २१ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. हे सर्व शेतकरी ‘ऑल इंडिया शेतकरी सभे’च्या बॅनरखाली बाईक रॅलिद्वारे दिल्लीला जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ठाणे, पालघर, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या या बाईक रॅलीमध्ये २५० दुचाक्यांचा समावेश असून १,२६६ किमी अंतर पार करण्यासाठी त्यांना चार दिवस लागणार आहेत. यासाठी त्यांना मध्य प्रदेश आणि राजस्थान ही राज्ये ओलांडावी लागणार आहेत.

Story img Loader