झी मराठीवरच्या जय मल्हार आणि काहे दिया परदेस या दोन मालिका आठवत आहेत का? या दोन्ही मालिका मराठी प्रेक्षक विसरणे शक्यच नाही. शीव- गौरी अर्थात ऋषी सक्सेना आणि सायली संजीव ही जोडी तर आजही अनेकांची आवडती जोडी आहे. तर जय मल्हार मालिकेत बानूची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री इशा केसकर ही तेवढीच गाजली.

काही दिवसांपूर्वी ऋषी आणि सायली रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. पण आता ऋषीचे नाव इशासोबत जोडले जात आहे. इशा आणि शीवचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचा हा फोटो पाहून इशा आणि ऋषी यांच्यामध्ये ‘काही’ सुरु आहे का, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. मात्र दोघांपैकी कोणीही याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्याचे झाले असे की, ऋषीने जवळपास महिन्याभरापूर्वी इशासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

या फोटोला त्याने ‘या गोष्टीला बराच काळ झाला…’ असे कॅप्शन दिले होते. त्याच्या या फोटोवर दोघांच्याही चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. तुम्ही एकमेकांना डेट करत आहात का? अशा प्रश्नासह तुम्हा दोघांची जोडी फार चांगली दिसते असेही काहींनी सांगितले. इशा किंवा ऋषी दोघांनीही चाहत्यांच्या या प्रश्नांना कोणतेही उत्तर दिलेले नाही.

View this post on Instagram

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

A post shared by ईशा केसकर (@ishagramss)