जेनिफर विंगेट सध्या आयुष्याचा सर्वोत्तम काळ एन्जॉय करताना दिसतेय. आयुष्यात कितीही दुःख आली तरी जेनिफरने त्याचा धिटाईने सामना केला. कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदी राहण्यापासून अडवू शकत नाही. करण सिंग ग्रोवरला घटस्फोट दिल्यानंतर तिच्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला होता. पण या कठीण काळातून बाहेर निघतानाही तिने करणबाबत कोणताही द्वेष मनात ठेवला नाही.

सध्या ती ‘बेहद’ या मालिकेतून सर्वांची मनं जिंकत आहे. नुकतेच तिने ‘बॉम्बे टाइम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अयशस्वी लग्न, भविष्यातले काही प्लॅन आणि पुन्हा लग्न करण्याचा विचार यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. पहिलं लग्न अपयशी ठरलं म्हणून काही प्रेम संपत नाही, असा विश्वास तिला आहे. पुन्हा एकदा प्रेमात पडायला ती तयार असल्याचं तिने सांगितलं.

रणबीरचे दहावीचे गुण तुम्हाला माहित आहे का?

आपल्या लग्नाबद्दल बोलताना तिने म्हटले की, ‘एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही सर्वस्व दिले असताना आणि ते टिकावी म्हणून जे काही शक्य आहे ते सर्व केले, त्यामुळे मी याला अयशस्वी म्हणूच शकत नाही. प्रेमाची दारं मी कधीच बंद केली नाहीत. मग ती आयुष्याच्या जोडीदाराबाबत तरी का ठेवा? माझ्या आयुष्यात प्रेमाची उणीव नाहीये. मी आज जे प्रेम अनुभवतेय ते याआधी मी कधीच अनुभवलं नाही. मी खूप आनंदी आहे. लग्नाबद्दल विचाराल तर जर दोन व्यक्तींना एकत्र राहायचे असेल तर त्यासाठी लग्न ही एक उत्तम संस्था आहे. पण हा दोघांचा निर्णय असला पाहिजे.’

‘जेव्हा तुम्ही एखाद्यावर जीवापाड प्रेम करता तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीसाठी सर्व काही सर्वोत्तम असावे असंच तुम्हाला वाटतं. तुम्ही त्याच्या चुकाही पदरात घालता. पण या निर्णयामध्ये तुमचं आयुष्य खूप खडतर होतं. त्यांच्या आयुष्यात आता आपल्याला काही स्थान नाही हे कटू सत्य स्वीकारून त्या व्यक्तीला मुक्त करणं हेच आपल्या हातात असतं. एखाद्यावर जीवापाड प्रेम करणं म्हणजे त्या व्यक्तीला मुक्त ठेवणं. लग्नच असं नाही पण कोणत्याही रिलेशनशीपचा शेवट ब्रेकअपमध्ये होणं हे वाईटच आहे.’

‘मी त्याच्यासोबत इतकी वर्षे राहिली आहे, त्यामुळे अर्थातच या परिस्थितीतून बाहेर पडायला मलाही वेळ लागला. भावनांची सळमिसळ मी यावेळी अनुभवली. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला हाच काळ सर्वाधिक ताकद देऊन गेला. मला माझ्या कुटुंबियांची आणि मित्र-मैत्रिणींची साथ होतीच. आज आम्ही सर्वच समाधानी आयुष्य जगत आहोत.’

जेनिफरच्या मनात करणसाठी कोणताही द्वेष नाही. ती म्हणाली की, ‘माझ्या मनात कोणाचबद्दल राग, मत्सर नाही. आपण सर्वच माणसं आहोत. त्यामुळे कोणीच परिपूर्ण नाही. जर मी चुकाच केल्या नाहीत तर मी शिकणार कशी? मी माझ्या मुलांनाही खूप साऱ्या चुका करायला सांगेन. त्यातूनच ते शिकतील. आदर्श माणूस, आदर्श स्त्री किंवा आदर्श नाते असे काहीच नसते. आयुष्यात चढ- उतार हे येतच असतात.’

वजन कमी न झाल्याने अनुष्का प्रभासच्या चित्रपटाला मुकली!

‘माझं लग्न जरी मोडलं असलं तरी त्याच्या कोणत्याही कटू आठवणी माझ्यासोबत नाहीत. उलट मी करणचे आभारच मानेन, त्याच्यामुळे मी स्वतःला ओळखू शकले. त्याच्यामुळेच मला नव्याने कळले की माझे खरे मित्र कोण आहेत आणि माझं कुटुंब किती सुंदर आहे. जर हे लग्न आणि घटस्फोट झाला नसता तर मी कदाचित एक वेगळी जेनिफर तुमच्यासमोर असते. मला त्याच्या आई- वडिलांकडूनही खूप प्रेम मिळालं. मला कशाचाच पश्चाताप नाही. उलट मी स्वतःला समाधानी मानते.’