बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा नवरा करण सिंग ग्रोव्हर सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यांच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण ते आपल्या चाहत्यांसोबत सतत शेअर करत असतात. करणची दुसरी पत्नी जेनिफर विंगेटशी घटस्फोट घेतल्यानंतर करणने बिपाशाशी लग्न केले. यादरम्यान दोघीही कधी कोणत्याच कार्यक्रमात एकत्र दिसल्या नाहीत शिवाय एकमेकींबद्दल कधी ब्रही काढला नाही. पण आता तुम्ही म्हणाल अचानक बिपाशा आणि करणचा विषय कुठून आला. पण तुम्हाला माहित आहे का, नुकताच बिपाशाने करणच्या दुसऱ्या बायकोचा एक व्हिडिओ लाइक केला आहे. आता विषयच जर नवऱ्याच्या आधीच्या बायकोचा असेल तर चर्चा तर होणारच ना?
त्याचे असे झाले की, जेनिफरने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्या चाहत्यांनी, सहकलाकारांनी आणि मित्र- मंडळींनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या. या सर्वांचेच आभार मानण्यासाठी तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. बिपाशा बासूने हा व्हिडिओ पाहिला आणि नुसता पाहिलाच नाही तर त्याला पसंतीही दिली. बिपाशा ज्यांना फॉलो करते त्यात जेनिफर नाहीये. त्यामुळे बिपाशाला सर्च केल्याशिवाय काही जेनिफरचे व्हिडिओ दिसणार नाहीत. मग बिपाशाने खास तिला सर्च केलं असेल का हाही एक मोठा प्रश्न उपस्थित राहतो. त्यामुळे जर भविष्यात बिपाशा आणि जेनिफरमध्ये मैत्रीचे नाते तयार झाले तर त्याचे आश्चर्य वाटून घेऊ नका. या मायानगरीत कधीही काहीही होऊ शकतं.
जेनिफर सध्या प्रसिद्ध टिव्ही मालिका ‘बेहद’मध्ये एक नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे. या भूमिकेला अनेकांची पसंतीही मिळाली आहे. जेनिफर आणि करण पहिल्यांदा ‘दिल मिल गए’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान भेटले होते. पण दोन वर्षांचा त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या काही महिन्यानंतरच करणने बिपाशाशी लग्न केले.