‘जोकर’ हा सिनेसृष्टीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेंपैकी एक म्हणून ओळखला जातो. या व्यक्तिरेखेवर आधारित असलेला ‘जोकर’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटात विदूषकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता जोक्विन फीनिक्सला वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले आहे. त्याने यंदाच्या ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

“माझ्या ‘किरण’वर बनवला चित्रपट”; सलमाननं शाहरुखवर केला आरोप

‘गोल्डन ग्लोब’ हा ऑस्कर नंतरचा सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कार म्हणून ओळखला जातो. प्रेक्षक व समिक्षक या दोघांच्याही पसंतीस पडलेल्या मोजक्याच कलाकृतींना या पुरस्काराच्या नामांकन यादीत स्थान मिळते. तसेच हा पुरस्कार पटकावणारे कलाकार व चित्रपट यांना हमखास ऑस्करच्या यादीत स्थान मिळते असा आजवरचा इतिहास आहे. किंबहूना गोल्डन ग्लोब ही ऑस्करची पहिली पायरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे हा पुरस्कार मिळवणे हे सिनेसृष्टीतील जवळपास प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते.

‘ग्लॅडिएटर’, ‘वॉक द लाईन’, ‘द मास्टर’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून आपल्या अफलातून अभिनयाचे प्रदर्शन करणारा जोक्विन फीनिक्स हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. यंदाचा त्याचा हा तिसरा गोल्डन ग्लोब पुरस्कार आहे.

Irrfan Khan: टायर विकणाऱ्याचा मुलगा आज आहे बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता

‘जोकर’ या चित्रपटाने तिकीट बारीवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आश्चर्याची बाब म्हणजे दोन ऑक्टोंबरला प्रदर्शित झालेल्या ‘जोकर’ने पहिल्या आठ दिवसात जगभरातून तब्बल २ हजार १०० कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली होती. भारतातही या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. अगदी मोजक्याच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊन देखील या चित्रपटाने भारतात ३२.७ कोटी रुपयांची कमाई केली होती.