अनेकांना सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यात मोठा रस असतो. बॉलिवूड़मध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना अनेकदा कोर्टाची पायरी चढावी लागली आहे. अनेक सेलिब्रिटींवर विविध आरोप करण्यात आले होते. यात अभिनेता सलमान खान तसचं संजय दत्त याची नाव पुढे आहेत. मात्र अभिनेता जॉन अब्राहमलादेखील एका गुन्ह्यासाठी दंड भरावा लागला असून त्याला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

अ‍ॅक्शन हिरो जॉन अब्राहमवर 2010 सालात रॅश ड्रायव्हिंगचा आरोप करण्यात आला होता. या आरोपामुळे न्यायालयाने जॉनला १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसचं पंधराशे रुपयांचा दंड त्याला ठोठावण्यात आला होता.

२००६ मधील एक अपघाताच्या सुनावणी दरम्यान जॉनवर ही कारवाई करण्यात आली होती. २००६ सालात खार दांडा इथं रात्री ११ वाजता जॉन वेगाने बाईक चालवत होता. यावेळी त्याने रस्त्यावरील दोन व्यक्तींना ठोकर दिली. यात दोन्ही तरुणांना दुखापती झाली. त्यामुळे कोर्टाने या व्यक्तींना एक हजार रुपये देण्यास जॉनला सांगितलं. सुनावणी दरम्यान जॉन कोर्टात असल्याने त्याने लगेचच ही रक्कम त्या तरुणांना देऊ केली. वकिलांच्या मदतीने जॉनने जामिन अर्ज दाखल केल्याने त्यावेळी जॉनला जामीन मंजूर करण्यात आला आणि त्याचा कारावास टळला.

रॅश ड्रायव्हिंगच्या आरोपासाठी कारावासाची शिक्षा आहे. मात्र जॉनने अपघाताच्या रात्रीच घटनास्थळावरून पळ न काढता. जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल केलं होतं.

जॉन अब्राहम लवकरच ‘एक व्हिलन 2’, ‘सत्यमेव जयते-2’ या सिनेमांमधून झळकरणार आहे.