बॉलिवूड आणि घराणेशाही हा वाद कधी न थांबणार आहे. सेलिब्रिटींच्या मुलांना या क्षेत्रात कोणते ही स्ट्रगल न करता एण्ट्री मिळते. यावरून नेहमीच टीका केली जाते. परंतु काही आहेत जे याला अपवाद आहेत. लोकप्रिय विनोदवीर अभिनेता जॉनी लिव्हरची मुलगी जेमी लिव्हर आहे. गेल्या ८ वर्षांपासून जॅमीचा हा संघर्ष सुरूच आहे. तिच्या या संघर्षाबद्दल जॅमीने एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे.

जॅमीला आजही लोकप्रिय विनोदवीर अभिनेते जॉनी लिव्हरची मुलगी म्हणून ओळखले जाते. अभिनय क्षेत्रात तिला स्वत: ची ओळख निर्माण करायची आहे म्हणून ती गेल्या ८ वर्षांपासून काम शोधत आहे. “मला अभिनयाच्या क्षेत्रातच करिअर करायचे आहे. ते ही स्वतःच्या बळावर करायचे आहे. त्यामुळे मी आतापर्यंत वडिलांची मदत घेतलेली नाही अथवा त्यांनी देखील माझी शिफारस कोणाकडे केलेली नाही अथवा शिफारसीसाठी फोनही केलेला नाही. त्यांनी असे काही करावे असे मी कधीही त्यांना सुचवले देखील नाही,” असे जॅमी म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jamie Lever (@its_jamielever)

वडील जॉनी लिव्हर यांच्याबद्दल बोलताना जॅमी पुढे म्हणाली, “भारतातील सर्वश्रेष्ठ विनोदवीर अभिनेत्यांपैकी एक माझे वडील जॉनी लिव्हर यांचे नाव घेतले जाते. साडेतीन दशके ते मनोरंजन विश्वामध्ये काम करत आहेत. आतापर्यंत १३ वेळा त्यांना फिल्मफेअरचे नामांकन मिळाले आहे. एक काळ असा होता की, प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शकाला त्यांच्या चित्रपटामध्ये जॉनी लिव्हर हवेच होते. अशा ख्यातनाम वडिलांची मुलगी असल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Jamie Lever (@its_jamielever)

तिच्या कामाविषयी बोलताना जॅमी म्हणाली, “मला या गोष्टीचा आनंद आहे की मला जी काही कामं मिळाली ती माझ्या हिंमतीवर आणि माझ्या गुणांमुळे मला मिळाली. कुणी माझी शिफारस केली म्हणून ती कामे मला मिळाली नाहीत.”

आणखी वाचा : “पत्नीच्या भावाने CCTV बंद करुन मारले आणि आता…,”करण मेहराने सांगितली त्या रात्रीची कहाणी

जेमी लिवरने २०१२ मध्ये लंडनस्थित मार्केट रिसर्च एजन्सीमध्ये मार्केटिंग एक्सिक्युटिव म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर ती मुंबईतील ‘द कॉमिडी स्टोरी’मध्ये स्टँड अप कॉमेडियन म्हणून काम करायला सुरुवात केली. तिने काही कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले आणि ‘किस किसको प्या करूं’ आणि ‘हाऊसफुल ४’ या सिनेमांमध्ये तिने काम केले. जेमी मिमिक्री करण्यात माहिर आहे. तिने रानी मुखर्जी, सोनम कपूर, करीना कपूर, हेमा मालिनी यांची हुबेहुब नक्कल करते.