ईदच्या मुहूर्तावर सलमानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ट्युबलाइट’ प्रदर्शित झाला. सलमानची अनोखी भूमिका असलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होती. मात्र कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही असंच काहीसं चित्र दिसतंय. ईदच्या मुहूर्तवार प्रदर्शित झालेल्या सलमानच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत ‘ट्युबलाइट’ची कमाईसुद्धा कमी झाली. चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त करण्यासाठी आता लोक सोशल मीडियाचा उपयोग करत आहेत. प्रदर्शनापासून सोशल मीडियावर चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

दिग्दर्शक कबीर खान आणि सलमान खान या चित्रपटासाठी तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. याआधी ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटांतून या दोघांच्या जोडीने कमाल केली होती. त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांच्या अपेक्षा यावेळी अधिक होत्या. ‘ट्युबलाइट’ चित्रपटाच्या कथानकात तेवढा दम नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. बॉलिवूडचा ‘बादशहा’ शाहरूख खान यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला. मात्र शाहरूखचा कॅमिओसुद्धा प्रेक्षकांना विशेष पसंत नाही पडला. सोशल मीडियावर सलमानच्या चाहत्यांनी आपल्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक हास्यास्पद ओळी आणि जोक्ससुद्धा चित्रपटावर बनवण्यात आले आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसले.

https://twitter.com/sagarcasm/status/878115947780780032

https://twitter.com/aww_raja/status/878248146979086337

वाचा : ‘ट्युबलाइट’ अपयशी ठरला, हे इतक्यातच ठरवू नका; कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटात सलमान खान, सोहेल खान, झू झू यांसारखे कलाकार असूनही कमकुवत कथानकामुळे ‘ट्युबलाइट’चा प्रकाश मंदच राहिला असं म्हणावं लागेल. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिळालेल्या काही नकारात्मक परिक्षणाचा फटका ‘ट्युबलाइट’ चित्रपटाला बसला. या चित्रपटाने शनिवारी २१.१७ कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारच्या तुलनेत हा आकडा अगदी संथ गतीने पुढे गेल्याचं पाहायला मिळालं. तर पहिल्या तीन दिवसांमध्ये चित्रपटाने एकूण ६४.७७ कोटींची कमाई केली आहे.