सोशल मीडियावर कोणत्या गोष्टींवरून कसे जोक्स व्हायरल होतील काही सांगता येत नाहीत. राजकारण्यांपासून ते अगदी कलाकारांपर्यंत अनेकांनाच या जोक्सचा सामना करावा लागतो. काहीजण याकडे मजामस्तीने बघतात तर काहींना त्यांची उडवलेली खिल्ली फारशी आवडत नाही. पण कोणाला काही आवडो अथवा न आवडो सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस काही कमी होत नाही. आता हेच बघा ना.. सैराट sairat सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला झिंगाट करून सोडलं होतं. या सिनेमावर त्यातही आर्ची आणि परश्यावर नेक जोक्स व्हायरल झाले होते. ‘मराठीत सांगितलेलं कळतं नाही का? इंग्लिशमध्ये सांगू?’ या रिंकू राजगुरूच्या rinku rajguru पडद्यावरच्या डायलॉगवरुन जोक्स येत होते.
‘मॉम’नंतर श्रीदेवी ‘मिस्टर इंडिया २’ साठी सज्ज
यंदा रिंकूने दहावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे तिला किती टक्के मिळतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं होत. दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच आर्चीवर काही जोक्स व्हॉट्सअॅपवर फिरत होते. निकालाचं टेन्शन कमी करण्यासाठीच दहावीच्या निकालांवर आणि त्यातही आर्चीवरच्या जोक्सचा आनंद घेतला जात होता.
‘मराठीत सांगितलेलं कळतं नाही का? इंग्लिशमध्ये सांगू?’ या तिच्या पडद्यावरच्या हीट डायलॉगवरुन भरभरून जोक्स येत होते. रिंकूला दहावीला ६६ टक्के मार्क्स मिळाले. पण, तिला इंग्रजी विषयात किती मार्क्स मिळतात याची उत्सुकता अनेकांना होती. तिच्या इंग्रजीच्या मार्कांवरून सोशल मीडियावर खूप जोक्स फिरत होते. इंग्रजीच्या मार्कांवरून व्हायरल होणाऱ्या जोक्सवर प्रतिक्रिया देताना रिंकू म्हणाली की, मला या गोष्टीचा राग येत नाही, उलट मी या जोक्सचा आनंद घेते.
दहावी रिझल्ट स्पेशल
मुलगा – पप्पा एक आनंदाची बातमी आहे.
पप्पा – काय…?
मुलगा – तुम्ही म्हणाला होता, पास झाला तर बाइक घेऊन देईन.
पप्पा – हो…मग आनंदाची बातमी काय आहे?
मुलगा – तुमचे पैसे वाचले.
——
परशालाही टेन्शन होतं म्हणे दहावीच्या निकालाचं…आर्चीचा निकाल होता ना.
आर्ची – मराठीत सांगितलेलं समजत नाही? इंग्लिशमध्ये सांगू ?
परशा – नको मराठीतच सांग ….पहिले इंग्रजीमधले मार्क सांग तुझे.
आज अख्या महाराष्ट्राला टेन्शन ।।
——
४४ वर्षांचा अनुराग कश्यप २३ वर्षांच्या मुलीला करतोय डेट
आर्चीला उद्या किती टक्के पडतील
#१० चा निकाल
म्हणे ६६.४% मिळालेत
जसं की
.
जितके वजन
.
.
.
.
तेव्हढे टक्के ….
.
आपली लाडकी आर्ची
[jwplayer jkMvvG9x]