बॉलिवूड चित्रपटांमध्ये ‘डबल रोल’ भूमिका नेहमीच यशस्वी ठरल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत असे अनेक चित्रपट आलेत ज्यांमध्ये आपण अभिनेते आणि अभिनेत्रींना दुहेरी भूमिका साकारताना पाहिलेय. ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ने चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता वरुण धवन त्याच्या वडिलांच्या म्हणजेच दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या ‘जुडवा २’ चित्रपटात पहिल्यांदाच दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच्यासोबत यात जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. जॅकलिनने ‘रॉय’मध्ये दुहेरी भूमिका साकारली होती.

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘मुबारकाँ’ आणि त्याआधी ‘औरंगजेब’ या चित्रपटांमध्ये अर्जुन कपूर दुहेरी भूमिकेत दिसला होता. ‘ढाई किलो का हाथ जिसपे पडता है वो उठता नहीं, उठ जाता है..’ असं म्हणत खलनायकांवर भारी पडणारा सनी देओल ‘भैया जी सुपरहिट’ मध्ये दुहेरी भूमिका साकारतोय. यात त्याच्यासोबत अमिषा पटेल आणि प्रिती झिंटा यांच्याही भूमिका आहेत.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!

बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनी हिला आपण २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मस्तीजादे’ चित्रपटात दुहेरी भूमिकेत पाहिले. यात तिने तुषार कपूर आणि वीर दासच्या प्रेयसीची भूमिका साकारलेली.

वाचा : …म्हणून पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार इशा देओल

सलमान खानने ‘प्रेम रतन धन पायो’ मध्ये राजकुमार आणि सामान्य माणूस अशी दुहेरी भूमिका साकारली होती. ‘जुडवा’मधील सलमानची भूमिका तर आजही सर्वांच्या लक्षात आहे.

‘तनु वेड्स मनू रिटर्न्स’मध्ये क्वीन कंगना रणौतने तर ‘एलोन’ चित्रपटात बिपाशा बसूने दुहेरी भूमिका वठवलेली.

बॉलिवूडमधील आघाडीच्या खान अभिनेत्यांमधील आमिर खान आणि शाहरुख खान यांनी अनुक्रमे ‘धूम ३’ आणि ‘फॅन’मध्ये दुहेरी भूमिका साकारून त्यांच्या चाहत्यांना जणू डबल ट्रीटच दिली होती. याव्यतिरीक्त अजय देवगण, हृतिक रोशन यांनाही आपण दुहेरी भूमिकेत पाहिलेय. पण, बॉलिवूडमध्ये पहिली दुहेरी भूमिका कोणी साकारलेली माहितीये का?

वाचा : टायगरच्या एका इशाऱ्यावर दिशाने रॅम्प वॉकवरुन घेतली माघार

आता तंत्रज्ञान आणि प्रोस्थेटिक मेकअपमुळे एकाच अभिनेत्याला विविध भूमिकांमध्ये दाखविणे सहजसोपे झाले आहे. पण, पूर्वी तंत्रज्ञान आताएवढे इतके प्रगत नव्हते. अगदी तेव्हापासून हिंदी चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका ही संकल्पना वापरण्यात येतेय. पहिल्यांदाच दुहेरी भूमिका साकारण्याचे श्रेय अभिनेत्री नर्गिस यांना जाते. ‘अनोखी’ या १९५२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी राजकुमारी आणि नर्तकी अशा दोन भूमिका साकारलेल्या. त्यानंतर ‘हम दोनों’, ‘राम और श्याम’, ‘सीता और गीता’, ‘चालबाज’ या चित्रपटांमध्ये विविध कलाकारांनी दुहेरी भूमिका केल्या.