शेकडो लाईट असलेला पोशाख परिधान करून बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी ‘सारा जमाना…’ या प्रसिध्द गाण्यावर केलेले बहुचर्चित नृत्य आठवते का? अमिताभ बच्चन यांच्या ‘याराना’ चित्रपटातील हे गाणे चांगलेच गाजलेले होते. ‘याराना’मधील मूळ गाणे हृतिकचे काका राजेश रोशन यांनी साकारले होते. आता हृतिक रोशनच्या ‘काबिल’ चित्रपटाच्या निमित्ताने हे गाणे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार आहे. उर्वशी रौतेला या गाण्यावर थिरकली असल्याने ते अधिकच ‘पेपी’ आणि ‘सिझलिंग’ झाले आहे. नुकतीच या गाण्याची झलक प्रदर्शित करण्यात आली.

विविध अभिनेत्रींची नावे पुढे येत असताना सरतेशेवटी हे गाणे पटकाविण्यात उर्वशीने बाजी मारली. ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ चित्रपटातील अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या याआधी प्रदर्शित झालेल्या ‘गल बन गयी’ या संगीत व्हिडिओलादेखील युट्युबवर चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ चित्रपटातील गाणी आणि ‘गल बन गयी’ गाण्यातून तिने नृत्यकौशल्य सिद्ध केले आहे. आमच्या चित्रपटात हे गाणे महिला पार्श्वगायिकेने गायल्याचे गाण्याविषयी अधिक माहिती देताना एका मुलाखतीदरम्यान ‘काबिल’चे दिग्दर्शक संजय गुप्ता म्हणाले होते. त्याचप्रमाणे उर्वशीवर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे अतिशय दिमाखदार झाल्याचेदेखील त्यांनी सांगितले होते. मुळ गाण्याचा उल्लेख होताच अमिताभ बच्चन यांनी परिधान केलेल्या दिव्यांच्या पोशाखाची आठवण होते. आजही हे गाणे पाहताना अनेकांचे डोळे आश्चर्याने विस्फारतात. आम्हीसुध्दा त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले होते. गाण्यात दिव्यांच्या रोषणाईचा झगमगाट दिसण्यासाठी आणि जुन्या गाण्याप्रमाणे प्रभाव साधण्यासाठी ‘फिल्मिस्तान स्टुडिओ’मध्ये गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान अनेक दिव्यांचा वापर करण्यात आला होता. चित्रिकरणासाठी एक मोठा घुमट उभारण्यात आला होता. उर्वशीनेदेखील आकर्षक नृत्य सादर केल्याची आठवण त्यांनी बोलून दाखवली होती.

पाहा काबिलमधील उर्वशी रौतेलाच्या सारा जमाना गाण्याचा टिझर

रोमँटिक ड्रामा प्रकारातील ‘काबिल’ चित्रपटात अभिनेत्री यामी गौतम हृतिकसोबत रोमान्स करताना दिसेल. संजय गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात रोनित रॉय आणि सोनु सूद यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात हृतिकचा ‘काबिल’ आणि बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा ‘रईस’ एकमेकांसमोर ठाकणार आहेत.

‘काबिल’च्या सेटवर उर्वशी रौतेला</p>

नव्या ढंगातील गाण्याबाबतचे हृतिकचे टि्वट

आता या गाण्याचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सिनेरसिक उत्सुक आहेत.