मुंबईहून परतण्यापूर्वी सुपरस्टार रजनीकांत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांची बुधवारी भेट घेतली. धारावीसह मुंबईच्या काही भागांमध्ये रंजीत दिग्दर्शित ‘काला करिकालन’ या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं. धनुषच्या ‘वंडरबार फिल्म्स’ या संस्थेअंतर्गत ‘काला करिकालन’ या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच रजनीकांत यांच्यासोबतच या सिनेमाची इतर स्टारकास्टही तितक्याच ताकदीची आहे. हुमा कुरेशी, समुथीरकनी, नाना पाटेकर, ईश्वरी राव, अंजली पाटील हे कलाकारही या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अमृता यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून रजनीकांत यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले. यावेळी त्यांनी सामाजिक समस्या आणि त्याचे निरसण यांच्यावर गप्पा मारल्या.

अमृता आणि रजनीकांत यांच्या या भेटी मागे दोन मुख्य कारणं होती. एक म्हणजे अमृता या प्रशिक्षित गायिका आहेत आणि काला या सिनेमात गाणं गाऊन त्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसेच रजनीकांत राजकारणात येण्याचा विचार करत आहेत त्यामुळे रजनीकांत यांना त्यांच्या पार्टीमध्ये घेण्यासाठी त्या प्रयत्न करत असल्याचे म्हटले जातेय. पण रजनीकांत हे तामिळनाडूमध्ये भाजपासोबत न जाता स्वतःची पार्टी स्थापन करण्याच्या विचारात आहेत. तसेच त्यांची ही पार्टी राष्ट्रीय पातळीवर काम करणारी असेल असेही म्हटले जाते.

View this post on Instagram

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)