ज्येष्ठ अभिनेता कादर खान यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. कॅनडातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते. नववर्षाच्या सुरुवातीलाच कादर खान यांचं निधन झाल्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. आपल्या दमदार अभिनयाने कादर खान यांनी अनेक भूमिका गाजवल्या. सुरुवातीला चित्रपटांमध्ये मुख्य व्हिलन साकाराणारे कादर खान नंतर मात्र विनोदी भूमिकांकडे वळले. पण त्यांनी असं करण्यामागे एक कारण होतं. एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं होतं.

कादर खान यांच्या मुलांची अनेकदा मित्रांसोबत भांडणं होत असतं. अनेकदा मुलं फाटलेला शर्ट घेऊन घरी येत असत. कादर खान यांनी याबद्दल मुलांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, आमची मित्रांसोबत भांडणं झाली. ते म्हणतात की तुझे वडील संपूर्ण चित्रपटात हिरोला मारतात पण शेवटला स्वत: मार खातात. यानंतर कादर खान यांनी व्हिलनच्या भूमिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Veteran Telugu Actor Mohan Babu
दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील बड्या कुटुंबात वाद; ज्येष्ठ अभिनेत्याने पत्रकारावर केला हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”

आईवर उपचार करण्यासाठी डॉक्टरला खांद्यावर उचलून घेऊन आले होते कादर खान

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन

नशिबाने त्याचवेळी कादर खान यांच्याकडे हिंमतवाला चित्रपट आला. या चित्रपटाची कथा लिहिण्याची जबाबदारी कादर खान यांच्यावर होती. कादर खान यांनी अत्यंत चालाखीने विनोदी भूमिका आपल्याकडे घेतली. त्यांची ही भूमिका लोकांना इतकी आवडली की आठवडाभर जितेंद्र आणि श्रीदेवीचे पोस्टर लागल्यानंतर नंतर कादर खान यांचाही फोटोही पोस्टरवर लागला. तिथून कादर खान यांचा विनोदी भूमिकांचा प्रवास सुरु झाला.

यानंतर कादर खान यांनी मागे वळून पाहिलं नाही. आसरानी, अरुणा इराणी, शक्ती कपूर आणि गोविंदा यांच्यासोबत त्यांनी अनेक विनोदी भूमिका केल्या आणि चित्रपट गाजवले. विशेष करुन गोविंदा आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. प्रेक्षकांनी त्यांचे चित्रपट डोक्यावर उचलून घेतले. 1990 चा काळ दोघांच्या जोडीने अक्षरक्ष: गाजवला होता. साजन चले ससुराल, हिरो नंबर 1, कुली नंबर 1, दुल्हे राजा, हसीना मान जायेगी असे अनेक सुपरहिट चित्रपट दोघांनी केले.

 

Story img Loader