आपल्या मनासारखा जोडीदार निवडताना प्रांत, भाषा, संस्कृती पलीकडे जाऊन विचार करणारी तरुणी प्रत्यक्ष विवाह करून जेव्हा नव्या घरात जाते, तेव्हा दोन संस्कृतींचा मिलाफ साधताना नेमके काय होते? भिन्न जीवनशैली, विचारसरणी असलेली दोन्ही घरांची माणसे हळूहळू एकत्र येण्याची, एक होण्याची ही प्रक्रिया अनुभवण्याची संधी ‘काहे दिया परदेस’ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना मिळाली. या मालिकेमुळे सायली संजीव हा नवा चेहरा घराघरांत पोहोचला.
वाचा : PHOTOS ‘केदारनाथ’मधील सारा अली खानची पहिली झलक
काहे दिया परदेस मालिकेत सायलीने मराठमोळ्या मुलीची भूमिका साकारली होती. जी वाराणसीतील शिवच्या प्रेमात पडते. एक मराठी मुलगी लग्न होऊन परराज्यात गेल्यावर तेथील लोकांनाही ती आपलीशी करते. यावर मालिकेची कथा आधारित होती. जवळपास वर्षभर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर या मालिकेने काही दिवसांपूर्वीच सर्वांचा निरोप घेतला. मात्र, मालिका बंद झाल्यानंतर आता ही अभिनेत्री करतेय तरी काय? असा प्रश्न नक्कीच तिच्या चाहत्यांना पडला असेल.
वाचा : सिने‘नॉलेज’ अमिताभ- जया बच्चन यांचा पहिला एकत्र चित्रपट कोणता?
छोट्या पडद्यावर अगदी साधी भोळी भूमिका साकारणारी सायली सध्या बोल्ड फोटोशूट करण्यात दंग असल्याचे दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे फोटो शेअर करतेय. आजवर साडी आणि पंजाबी ड्रेसमध्ये आपण सायलीला पाहिलं असेल. पण, या फोटोंमध्ये सायली पाश्चिमात्य पोशाखात दिसत असून, तिचा ग्लॅमरस आणि हटके लूक पाहावयास मिळतो.
सायलीच्या ग्लॅमरस फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा भडीमार केला आहे.
https://www.instagram.com/p/BZfSGwlDYLj/
https://www.instagram.com/p/BZjUay0DG0y/
https://www.instagram.com/p/BZsUtUcDcV8/