बॉलिवूड सेलिब्रिटी हे कायमच चर्चेत असतात. कधी त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांमुळे तर कधी त्यांनी शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे ते सतत चर्चेत असतात. नुकाताच अभिनेत्री काजोलने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच ती व्हिडीओमध्ये हवेत सफरचंद कापताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी तिचा हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काजोलचा हा व्हिडीओ पाहून एका यूजरने ‘अन्न वाया घालवू नका. अनेक लोकं उपाशी मरतायेत. अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करु नका’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘लोकं उपाशी मरतायेत आणि तुम्हाला विनोद सुचतायेत. मॅडम अन्न वाया घालवू नका’ असे म्हटले आहे. सध्या काजोलला या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.