बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा ‘त्रिभंग’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात एखाद्या कुटुंबाला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीमध्ये काजोलने तिच्या खासगी आयुष्यावरही वक्तव्य केले आहे. तिने तिच्या आई-वडीलांच्या घटस्फोटावरही वक्तव्य केलं आहे.

‘कोईमोई’ने दिलेल्या वृत्तानुसार, काजोलने नेटफ्लिक्सवरील ‘बेहेन्सप्लॅनिंग’ या शोमध्ये तिच्या आई-वडीलांच्या विभक्त होण्यावर वक्तव्य केलं आहे. “साधारणपणे जेव्हा मी साडेचार वर्षांची होते तेव्हा माझे आई-वडील विभक्त झाले. यात चुकीचे असे काही नाही. माझे असे बरेच मित्र-मैत्रिणी आहेत ज्यांचे आई-वडील आजही एकत्र आहे. पण त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आहे. त्यामुळे त्यांचे बालपण खूप छान असे नव्हते. माझे माझ्या आई आणि वडीलांवर ते एकत्र असतानाही प्रेम होते आणि विभक्त झाल्यावर सुद्धा आहे” असे काजोल म्हणाली.

Rohit Sharma Shared Heart Wrenching Story of Daughter's Birth
लेकीच्या जन्मावेळी रोहित शर्मा पोहोचू शकला नाही, ‘हे’ दोन खेळाडू ठरले कारण; ५ वर्षांनी सांगितला मोठा प्रसंग
Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार

आणखी वाचा- खऱ्या आई-वडिलांविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे का? सुष्मिताच्या मुलीला प्रश्न विचारताच म्हणाली..

पुढे ती म्हणाली, “माझे बालपण खूप छान होते. माझे संगोपण अशा व्यक्तींनी केलं आहे ज्यांचे विचार खूप चांगले आहेत. ते व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत. त्यांनी मला आयुष्य काय आहे हे शिकवले. मी स्वत:ला भाग्यवान समजते.”

Video: गायिका प्रियांका बर्वेच्या चिमुकल्याची कमाल; आईला दिली गाण्यात साथ

‘त्रिभंग’ या चित्रपटात काजोल सोबत अभिनेत्री तन्वी आझमी आणि मिथिला पालकर मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट १५ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला प्रेक्षकांचा चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सगळ्यात जास्त पाहिला जाणारा चित्रपट ठरला असल्याचे म्हटले जाते.