बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन नुकतीच आई झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. कल्कीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आई झाल्याची माहिती दिल्यानंतर या बाळाचं नाव काय ठेवलं असेल याविषयी चाहत्यांना उत्सुकता होती. त्यातच कल्कीने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर करत तिच्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. यामध्येच आता तिने तिच्या बाळाचं नाव जाहीर केलं आहे.
बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कल्कीला कन्यारत्न झालं असून या बाळाचं नाव ठेवताना तिने खूप विचार केल्याचं दिसून येतं. कल्कीने तिच्या बाळाचं नाव साफो (Sappho) असं ठेवलं आहे. विशेष म्हणजे कल्कीने बाळाचं नाव जाहीर केल्यानंतर चाहत्यांमध्ये ही एकच चर्चा सुरु आहे. अनेक जण या नावामागचा अर्थ जाणून घेण्यास उत्सुक आहे.
साफो हा ग्रीक शब्द आहे. साफो हे एका कवयित्रीचं नाव असून तिचा प्रचंड नावलौकिक होता. त्यामुळेच कल्कीने आपल्या बाळाचं नावदेखील हेच ठेवलं. कल्कीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नाव जाहीर केलं.
कोण आहेत साफो?
‘लेस्बियन’ हा शब्द ‘लेस्बोस’ नावाच्या ग्रीक बेटावर बेतला आहे. या बेटावर ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात साफो (Sappho) नावाची कवयित्री राहात होती. तिच्या देखरेखीखाली अनेक तरुण स्त्रिया होत्या. या कवयित्रीने आपल्या काव्यातून स्त्रियांच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित केलं होतं आणि आपल्याला स्त्रिया आवडतात असं म्हटलं होतं.
“कृपया साफोचं स्वागत करा. नऊ महिने ती एखाद्या मोमोजप्रमाणे माझ्या गर्भाशयात शांत झोपली होती. त्यामुळे आता तिला या नव्या जगात थोडीशी जागा देऊयात. तिला अनेक आशिर्वाद आणि तिचं स्वागत केल्यामुळे मनापासून आभार आणि ज्या महिला प्रसुतीवेदनांना सामोऱ्या जाता त्या महिलांचा कायम आदर करा. त्यांचा हक्क आपण त्यांना दिला पाहिजे”, असं कल्कीने पोस्ट शेअर करत सांगितलं.
वाचा : अध्ययन सुमनच्या गर्लफ्रेंडने शेअर केला टॉपलेस फोटो
कल्की आणि अनुरागने २०११ मध्ये लग्न केलं होतं. मात्र त्यांचा संसार केवळ चार वर्षेच टिकला. २०१५ मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही कल्की आणि अनुराग एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ‘सेक्रेड गेम्स २’ या वेब सीरिजसाठी दोघांनी एकत्र कामसुद्धा केलं.