अभिनेता कमाल आर खान हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून केआरके बॉलिवूड कलाकारांशी पंगा घेताना दिसत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानशी पंगा घेतल्यानंतर मिका सिंगने त्याला ट्रोल केले होते. यानंतर केआरकेने अनेक कलाकारांवर टीका केली. आता केआरकेने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांविषयी भविष्यवाणी केली आहे.

केआरकेने ट्वीट करत कंगना, करीना कपूर, सैफ अली खान विषयी भविष्यवाणी केली आहे. दरम्यान, सगळ्यांचे लक्ष हे केआरकेने बॉलिवूडची देसी गर्ल आणि पती निक जोनसच्या नात्यावर केलेल्या भविष्यवाणीने वेधले आहे. केआरकेने ट्वीट करत प्रियांका आणि निकच्या नात्या विषयी भविष्यवाणी केली आहे. ‘पुढच्या १० वर्षांमध्ये निक प्रियांकाला घटस्फोट देईल’, अशा आशयाचे ट्वीट केआरकेने केले आहे.

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर इम्रानच्या पत्नीने केली होती ‘ही’ पोस्ट

त्याचे हे ट्वीट पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “तुला हद्दीत कसे राहायचे हे शिकवण्याची गरज आहे. ते काहीही करू शकतात परंतु कोणाच्याही वैयक्तिक जीवनावर भाष्य करण्याचा तुला अधिकार नाही.”

आणखी वाचा : ..मग मुस्लीम व्यक्तीशी लग्न करतानाच असं का?; आमिर-किरण रावच्या घटस्फोटावर कंगनाचा सवाल

एवढंच नाही तर पुढे केआरकेने कंगना विषयी ही एक भविष्यवाणी केली आहे. ‘कंगना कधीच लग्न करणार नाही’, असे ट्वीट केआरकेने केले. पुढे ‘करीना आणि सैफची दोन्ही मुलं त्यांच्या नावामुळे यशस्वी अभिनेते होणार नाही,’ असे ट्वीट देखील केआरकेने केले आहे.

Story img Loader