अभिनेता कमाल आर खान हा नेहमीच त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी केआरकेने बॉलिवूडचा भाईजान सलमान खान नंतर अक्षय कुमारवर निशाना साधला. आता केआरकेने अभिनेत्री विद्या बालनवर निशाना साधला आहे. विद्या बालनचा ‘शेरनी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यावेळी त्याने विद्याच्या या चित्रपटाचा रिव्हू्य दिला नाही. विद्याचा हा चित्रपट छोटा आहे आणि म्हणून तो या चित्रपटाचा रिव्हू्य देणार नाही असं केआरकेने वक्तव्यं केलं आहे. विद्याच्या चाहत्यांना ही गोष्ट पटली नाही आणि म्हणून त्यांनी केआरकेला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : ‘अक्षयला गरीबांचा मिथुन चक्रवर्ती बोलायचे; माझ्या गाण्यांमुळे…’, अभिजीत भट्टाचार्य

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”

केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून याविषयी सांगितले आहे. “बरेच लोक मला म्हणाले की शेरनी या चित्रपटाचा रिव्ह्यू करा. कृपया मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की मी असे छोटे चित्रपट पाहत नाही, त्याचा रिव्ह्यू करतं नाही किंवा अशा चित्रपटांबद्दल बोलत ही नाही. कारण मी द ब्रँड केआरके जगातील नंबर १चा चित्रपट समीक्षक आहे, असे ट्वीट केआरकेने केले,” अशा आशयाचे ट्वीट केआरकेने केले आहे.

आणखी वाचा : ‘निर्मात्याने मला हॉटेल रूममध्ये…’, नीना गुप्ता यांनी सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

त्याला ट्रोल करतं विद्याचा एक चाहता म्हणाला, “आम्हाला कळतं, परंतु हा चित्रपट तुझ्या इतका छोटा नाही. तरी, तुला पाहायची गरज नाही. हा चित्रपट तुझ्या सारख्या लहान आणि छोट्या ब्रँडसाठी नाही आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “चित्रपट समीक्षक म्हणून तू प्रत्येक चित्रपटाचा रिव्ह्यू दिला पाहिजे. समीक्षकासाठी कोणता चित्रपट हा लहान किंवा मोठा नसतो. परंतु, आम्हाला दिसतं आहे की तुझा एक अजेंडा आहे. तू मध्येच स्वत: च अकाऊंट हे प्रायव्हेट करतो तर मध्येच अनलॉक करतो. लोक हसतात तुमच्या सारख्यावर.”

आणखी वाचा : पत्नीला त्रासदायक म्हणणाऱ्या नेटकऱ्याला, शोएबने दिले सडेतोड उत्तर

दरम्यान, या आधी केआरकेने सलमानवर केलेल्या चुकीच्या आरोपांमुळे सलमानच्या टीमने त्याच्यावर मानहानीचा दावा केला आहे. सलमान भ्रष्टाचारी आहे, आणि त्याचे ब्रॅंड ‘बिंग ह्युमन’ हे सगळ्यांची फसवणूक, हेराफेरी आणि ते मनी लॉंड्रींगच्या व्यवसायात गुंतले आहेत असा आरोप केला, त्यामुळे केआरके विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे, असे सलमानच्या टीमने सांगितले.

Story img Loader