वायफळ बडबड आणि ट्विटमुळे स्वयंघोषित समीक्षक आणि अभिनेता कमाल आर खान नेहमीच चर्चेत असतो. तो अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आला नसला तरी आपल्या तथ्यहिन आणि व्यर्थ वक्तव्यांसाठी नक्कीच प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर चर्चेत राहणारा केआरके कधी कोणा कलाकाराविषयी वादग्रस्त वक्तव्य करतो तर कधी एखाद्या नवीन चित्रपटावर उलटसुलट समीक्षण देतो. त्याच्या याच सवयीमुळे त्याचे ट्विटर अकाऊंट काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आले.
वाचा : शाहरुखला पाहण्याची ‘मन्नत’ अनेकांना पडली महागात
‘दंगल’ फेम अभिनेता आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाबद्दल वाईट गोष्टी लिहिल्याबद्दल केआरकेचे अधिकृत ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले. खरंतर त्याचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यासाठी नक्की कोणी तक्रार केलेली याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. त्यानंतर आता केआरकेने त्याचे अकाऊंट सुरु करण्यासाठी धमकी दिली आहे.
वाचा : ‘ऐश्वर्याविषयीचे तसे बोलणे ऐकून मला वाईट वाटायचे’
कमालने माध्यमांसाठी एक प्रसिद्धिपत्रक प्रसिद्ध करत ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. पण, इतक्यावरच थांबेल तो केआरके कसला. त्याने या पत्रकात आपले अकाऊंट पुन्हा सुरु न केल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली आहे. या प्रसिद्धिपत्रकात त्याने लिहिलंय की, ‘१५ दिवसांच्या आत माझे अकाऊंट पुन्हा सुरु करण्यात यावे अशी मी @Twitterindia आणि महिमा कौल, विरल जैन आणि तरनजीत सिंह यांना विनंती करतो. आधी त्यांनी माझ्याकडून लाखो रुपये घेतले आणि एकेदिवशी अचानक माझे अकाऊंट बंद केले. त्यांनी माझी अशी फसवणूक केल्याने मी निराश झालोय. माझे अकाऊंट सुरु केले नाही तर मी आत्महत्या करेन आणि यासाठी हे लोक जबाबदार असतील.’