कमाल राशिद खान म्हणजेच केआरकेच्या चर्चांचा सिलसिला सुरूच आहे. सलमान खानच्या ‘राधे’ या सिनेमापासून या चर्चा सुरू झाल्या. सलमानसोबतच केआरकेने मिका सिंहसोबत पंगा घेतला. त्यानंतर आता केआरकेने पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर कमाल आर खानचं एक ट्विट सध्या चांगलचं व्हायरल होतंय. या ट्विटमध्ये आपली अवस्था सुशांत सिंह राजपूत सराखी होवू देणार नसल्याचं केआरके म्हणाला आहे.

केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये सलमान खानचं नाव न घेता दंबग खानवर निशाणा साधला आहे. “बॉलिवूडमधील गुंडा भाईजान मी ऑउटसायर जरी असलो तरी मी १०० टक्के दुसरा सुशांत सिंह राजपूत नाही बनणार हे लक्षात घे. मी मरणारही नाही आणि बॉलिवूडचा विजयही होणार नाहीय. यावेळी बॉलिवूडचा पराभव होणार. कारण यावेळी बॉलिवूडने चुकीच्या व्यक्तीसोबत पंगा घेतला आहे.” असं केआरके त्याच्या ट्वीटमध्ये म्हणालाय.

shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : ‘अनेकांचे पतंग कापले, पण माझा पतंग कुणीही कापलेला नाही’, छगन भुजबळांचं सूचक विधान
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Image Of PM Narendra Modi.
PM Narendra Modi : “मी देव नाही… माझ्याकडूनही चुका होतात”, पंतप्रधान मोदी पॉडकास्टमध्ये पहिल्यांदाच झळकणार
when sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie
“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”
What Chhagan Bhujbal Said?
Chhagan Bhujbal : “पवार कुटुंबाने, ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं; आम्हाला..”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…

पहा फोटो: ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेल्या दिशा पटानीकडे आज ५ कोटींचा फ्लॅट

 

View this post on Instagram

 

A post shared by KRK (@kamaalrkhan)

हे देखील वाचा: “लोक म्हणायचे मी काळी दिसते”; ‘द फॅमिली मॅन-२’ मधील अभिनेत्रीने केला वर्णभेदाचा सामना

केआरकेने बॉलिवूडवर साधला निशाणा

केआरके त्याच्या आणखी एका ट्विटमध्ये म्हणाला, “बॉलिवूडवाल्यांनो एक गोष्ट नीट लक्षात ठेवा आम्ही पश्चिम युपीचे लोक कधी कुणाला घाबरत नाही आणि कधी हार मानत नाही. तुमचं आव्हान स्विकार आहे. आता नेट निकाल लागणार” अशा आशयाचं ट्विट कमाल आर खानेन केलंय.

‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाच्या रिलीजनंतर केआरकेने या सिनेमावर आणि सलमानवर सडकून टीका केली होती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहचलं. सलमान खानने केआरकेवर मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर केआरकेने अनेक वादग्रस्त ट्वीट करत बॉलिवूडवर निशाणा साधण्यास सुरुवात केली.

Story img Loader