छोट्या पडद्यावरील बहुचर्चित अभिनेत्री काम्या पंजाबी तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर ती बोल्ड फोटोंमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. प्रियकर शलभ दंगसोबत दुबईत सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे काम्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काम्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही काही फोटो शेअर केले आहेत. शलभ आणि काम्या पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काम्याने तिच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं. दीड महिन्याच्या चॅटिंगनंतर शलभने कशाप्रकारे तिला लग्नासाठी विचारलं हे तिने या मुलाखतीत सांगितलं. शलभ दिल्ली स्थित असून त्याला एक १० वर्षांचा मुलगा आहे.

“पहिलं लग्न अयशस्वी ठरल्यानंतर मी लग्न, प्रेम या साऱ्याचा विचार करणं सोडून दिलं होतं. एक वेळ अशी होती जेव्हा मी पुन्हा लग्न करण्याच्या विरोधात होते. मात्र शलभमुळे माझा गेलेला आत्मविश्वास मला पुन्हा मिळाला आणि मी पुन्हा प्रेमात पडले. ”, असं ती सांगते.

आणखी वाचा : गोविंदाने सहा वेळा बदललं नाव; ‘हे’ आहे त्याचं खरं नाव

काम्याने २००३ मध्ये व्यावसायिक बंटी नेगी याच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र त्याचं नातं फार काळ टिकलं नाही. २०१३ मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. काम्याला ९ वर्षांची मुलगी आहे. बंटीने शारीरिक छळ केल्याचा आरोप काम्याने केला होता.