अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता स्थापन केल्यामुळे पुन्हा एकदा संकट निर्माण झाले आहे. अफगाणिस्तान सरकारने तालिबानसमोर गुडघे टेकले आहेत. देशातील नागरिक सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे काबुल विमानतळावर मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लोक विमानाला लटकल्याचे दिसत आहे. पण विमान आकाशात उडताच काही लोकांचा पडून मृत्यू झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. काबुल विमानतळावरील हा व्हिडीओ पाहून जगभारातून प्रतिक्रिया येत आहे. बॉलिवूड कलाकारांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती पाहून सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. तिने काबुल विमानतळावरील व्हिडीओ पाहून हळहळ वक्तव्य केली आहे. ‘जब जीना मौत से बत्तर हो…’ असे तिने व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘आमच्या जिवाला धोका आहे’, भावनिक पोस्ट शेअर करत अफगाणी निर्मातीने संपर्ण जगाला केले आवाहन

त्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने ‘हे हृदय पिळवटून टाकणारं आहे. कुणीही अशा परिस्थितीमधून जायला नको’ या आशाचे कॅप्शन व्हिडीओ शेअर करत दिले आहे.

Afghanistan Crisis, Taliban

Afghanistan Crisis, Taliban

अमेरिकी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या लष्करी विमानात जबरदस्तीने चढताना खाली कोसळल्याने आणि विमानतळावर रेटारेटी झाल्याने मनुष्यहानी झाली. एकाच वेळी शेकडो लोकांनी जबरदस्तीने अमेरिकी लष्करी विमानात घुसण्याचा प्रयत्न केला असता प्रचंड रेटारेटी झाली. विमानतळ रिकामा करताना त्यात सात जणांचा मत्यू झाल्याचे अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. तर विमानतळावरून पाच मृतदेह हलवताना पाहिल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, या पाच जणांचा मृत्यू गोळीबारात झाला की चेंगराचेंगरीत हे कळू शकत नाही, असे दुसऱ्या एका नागरिकाने सांगितले.