अभिनेत्री कंगना रणौतने वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात काही खुलासे केले. त्यासोबत अभिनेता हृतिक रोशन, आदित्य पांचोली, दिग्दर्शक करण जोहर यांच्यावर बरेच आरोप केले. आता कंगनाचे हेच आरोप तिच्या सामाजिक जीवनात अडथळा ठरत आहेत. अनेकांनी तिच्याकडे पाठ फिरवत हृतिकला साथ दिली हे गेल्या काही दिवसांत पाहायला मिळाले. यामध्येच आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. चित्रपटसृष्टीतील काही बहुप्रतिष्ठित सेलिब्रिटींच्या पार्टीतून कंगनाला डावलल्याचे वृत्त ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिले आहे.

अभिनेता डिनो मोरीया आणि नंदिता महतानी यांनी मिळून गेल्या वर्षी एक प्लेग्राऊंड लाँच केले होते. या प्रोजेक्टला एक वर्ष पूर्ण होणार असून त्यातून मिळालेले यश साजरा करण्यासाठी या दोघांनी एका मोठ्या पार्टीचे आयोजन केले आहे. गेल्या वर्षी हा प्लेग्राऊंड जेव्हा लाँच झाला, त्यावेळी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये कंगना उपस्थित होती. मात्र यावर्षी तिला निमंत्रित करण्याचे डिनो आणि नंदिताने टाळले.

Dino Morea and Nandita Mahtani
नंदिता महतानी, डिनो मोरीया

वाचा : उबर चालकाने अभिनेत्रीला शिवीगाळ करुन दाखवला बाहेरचा रस्ता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील ‘फोर सिझन्स हॉटेल’मध्ये या ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. २८ ऑक्टोबर रोजी ही पार्टी असून यामध्ये चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांना निमंत्रित केले गेले. यामध्ये हृतिक रोशन, करण जोहर, रणबीर कपूर, अर्जुन रामपाल, मलायका अरोरा, अभिषेक बच्चन, राज कुंद्रा आणि अरबाज खान यांचा समावेश आहे. हृतिक आणि करण जोहरचा कंगनाशी असलेला वाद सर्वांनाच माहीत आहे. अशा वेळी एकाच पार्टीमध्ये या तिघांना निमंत्रित करणे योग्य ठरणार नाही असा विचार बहुतेक डिनो आणि नंदिताने केला असावा. त्यामुळेच कंगनाचे नाव निमंत्रितांच्या यादीतून काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला.