सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये सुरु असलेल्या वादात आता बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने पुन्हा एकदा उडी घेतली आहे. कंगनाचं ट्विटर अकाऊंट बंद झाल्यानंतर आता ती इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली आहे. खास करून इन्स्टास्टोरीवर पोस्ट शेअर करत कंगना तिचं मत मांडताना दिसतेय.

गुरुवारी कंगनाने इन्स्टास्टोरीला एक पोस्ट शेअऱ करत ट्विटरवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ट्विटरने जारी केलेल्या पत्रकावरून कंगनाने ट्विटरवर टीका केलीय. या प्रत्रकात ट्विटरने कायद्याचं पालन करत आम्ही भारतीय लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं आणि गोपनियतेचं रक्षण करणार असल्याचं म्हंटलं आहे. याच मुद्द्यावरुन कंगनाने ट्विटरला घेरलं असून ट्विटर म्हणजे मुठभर नशेडी लोकांचा समूह असून ते सहज विकले जाऊ शकतात अशी टीका केलीय.

कंगना तिच्या पोस्टमध्ये म्हणाली, “बिचारा ट्विटर. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी भीक मागत आहे. संसदेचा अनिर्वाचित सदस्य, जगातील सर्वोच्च न्यायाधिश, मानवतेच्या नैतिकतेचा रक्षक.. आणि या शक्तीची मागणी करण्यासाठी किंवा सक्ती करण्याची त्याची मूलभूत पात्रता तरी काय आहे? हे आहेत तरी कोण? मुठभर ड्रग्ज घेणाऱी लोकं, जी सहज विकली जाऊ शकतात.” असं म्हणत कंगनाने ट्विटरवर निशाणा साधला आहे.

kangana-post

वाचा: समंथाला होणाऱ्या विरोधामुळे सासरे नागार्जुन चिंतेत; ‘द फॅमिली मॅन 2’ला तामिळनाडूत विरोध

पुढे कंगना तिच्या पोस्टमध्ये म्हणाली, ” फॉलोअर्स पासून प्रमोशनल ट्विट, प्रत्येक गोष्टीची किंमत असते. हे ते भांडवलदार आणि प्रायव्हेट बिझनेसमन आहेत ज्यांना देश चालवायचाय आहे. सरकारला धमकावून त्यावर नियंत्रण आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण ईस्ट इंडिया कंपनीकडून काहीच शिकलो नाही का?” असा सवाल कंगनाने उपस्थित केलाय.

कंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं असलं तरी कंगनाने ट्विटरवर आरोप करणं थांबवलेलं नाही. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत कंगनाने गेल्या काही दिवसात ट्विटर आणि ट्विटरच्या कार्यपद्धतीवर वेळोवेळी निशाणा साधला आहे.