बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर कंगना तिचं मत मांडताना दिसते. दरम्यान, कंगनाने आता बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे. यावेळी तिने मुस्लिम समुदाया संदर्भात एक प्रश्न विचारला आहे.

कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. “एक काळ असा होता जेव्हा पंजाबमधील कुटुंबांमध्ये एका मुलाला हिंदू तर दुसऱ्या मुलाला शीख धर्माचे पालन करावे लागायचे. तशी परंपरा होती. परंतु अशी परंपरा हिंदू आणि मुस्लिम, मुस्लिम आणि शीख समाजामध्ये नाही. आमिर खान सरांनी घटस्फोट घेतल्याचे मला आश्चर्य वाटले. त्यानंतर असा विचार मनात आला की, हिंदू आणि मुस्लीम आंतरधर्मिय लग्नातून जन्माला आलेली मुलं नेहमीच मुस्लिम का होतात. महिला हिंदू धर्माचे पालन का करू शकत नाही. काळानुसार आपल्याला या गोष्टीही बदलायला हव्यात. ही एक जुनी प्रथा आहे. जर एखाद्या कुटुंबामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख आणि नास्तिक एकत्र राहू शकतात तर मग मुस्लिम का नाही राहू शकत? एखाद्या मुस्लिम व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर आपल्याला धर्म का बदलावा लागतो?”,असे कंगना त्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

kangana ranaut questions inter faith marriage
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे.

‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणने २८ डिसेंबर २००५ सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर २०११ मध्ये सरोगसीच्या मदतीने मुलगा आझादचा जन्म झाला होता.

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटावर राखी सावंत म्हणाली…

किरण रावशी आमिर खानचं हे दुसरं लग्न होतं. या आधी १९८६ सालामध्ये आमिर आणि रीना दत्ता विवाहबंधनात अडकले होते. १६ वर्षांनी आमिरने रीनाला घटस्फोट दिला होता. रीना आणि आमिरला आयरा आणि जुनेद ही दोन मुलं आहेत.

आणखी वाचा : आराध्याचे नाव ठेवण्यासाठी अभिषेक आणि ऐश्वर्याला लागले होते ४ महिने!

कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट जयललिता यांच्या आयुष्यावर आहे. हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या दोन चित्रपटांमध्ये दिसेल.