बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत तिने नुकत्याच शेअर केलेल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. या फोटोंवरून कंगानाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलंय. कंगनाच्या ‘धाकड’ सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असून यानिमित्ताने एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत कंगनाने पांढऱ्या रंगाच्या पॅन्टवर पांढऱ्या रंगाचंच ब्रालेट परिधान केलं होतं. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कंगनाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलं.

अनेक नेटकऱ्यांनी संस्कृती आणि सनातनच्या गोष्टी करत कंगनावर निशाणा साधला आहे. अर्थातच ट्रोल करणाऱ्यांना कंगनाने सडेतोड उत्तर दिलंय. कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे. प्राचीन भारतीय पेहरावातील एका तरुणीचा फोटो कंगनाने तिच्या इन्स्टास्टोरीला शेअर केला आहे. हा फोटो शेअर तर तिने लिहिलं, “जे लोक मला सनातन धर्माबद्दल ज्ञान देत आहेत त्यांनी कृपया लक्षात घ्या तुम्ही अब्राहमिक सारखं वागत आहात.”असं म्हणत कंगनाने तिच्यावर टीका करणाऱ्यांना तुम्ही अब्राहमिक धर्मासारखे वागत असल्याचं म्हंटलं आहे.

(Photo-Instagram@kanganaranaut)

इतर सेलिब्रिटींना त्यांच्या कपड्यांवरून सल्ला देणारी कंगना स्वत: ब्रालेटमध्ये फोटो शेअर करते असं म्हणत अनेकांनी तिला ट्रोल केलं. एक नेटकरी म्हणाला, ‘तू एवढा घाणेरडा ड्रेस परिधान करशील अशी अपेक्षा नव्हती कंगना.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तू स्वतः इतरांच्या पोस्टवर कमेंट करते, असा फोटो शेअर करताना तू विचार केला नाहीस का?’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तू स्वत: ला सभ्य सनातन महिला म्हणते, तर हे सगळं काय आहे. दोन चेहरे कोणासाठी?’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘तू बॉलिवूडला आणि रिहानाला कपड्यावरून ज्ञान देते. आता काय झालं. भाजपाने तुला बाहेर काढलं का?’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं.

kangana-ranut-inside-post
(Photo-)Instagram@kanganaranaut

कंगना लवकरच ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे.या चित्रपटा व्यतिरिक्त कंगना लवकरच ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.