मराठा आरक्षणासोबतच ब्राह्मण समाजालाही आरक्षण देण्यात यावं अशी मागणी सातत्याने केली जात आहे. ब्राह्मण समाजाला जातीवर नव्हे तर आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावं अशी मागणी ब्राह्मण महासंघाकडून केली जात आहे. आरक्षणाचा मुद्दा भारताच्या इतिहासात कायमच वादग्रस्त ठरला आहे. या वादग्रस्त मुद्द्यावर अभिनेत्री कंगना रणौत हिने प्रतिक्रिया दिली. आरक्षण हे जातीनिहाय न देता आर्थिक निकषांवर देण्यात यावं अशी मागणी तिने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडते. यावेळी तिने आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. “आरक्षण हे जातीनिहाय न देता आर्थिक निकषांवर देण्यात यावं. मला माहिती आहे की रजपूतांना प्रचंड त्रास होतोय. पण ब्राम्हणांना पाहूनही मला दु:ख होतं.” अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.