अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. या चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. रिया चक्रवर्ती केवळ मोहरा आहे, खरा मास्टर माईंड कोणी दुसराच असल्याचा दावा कंगनाने केला आहे.

‘ब्लॅक पँथर’च्या शेवटच्या ट्विटनं रचला विक्रम; ट्विटरनं देखील केला ‘किंग ऑफ वकांडा’ला सलाम

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी तिने सुशांत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रिपब्लीक टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला. ती म्हणाली, “रिया नक्कीच खोटं बोलतेय, आधी तिने सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली नंतर सीबीआयने चौकशी करु नये म्हणून कोर्टात याचिका दाखल केली. तिनेच सुशांतला ड्रग्स वगैरे दिले आहेत. पण एवढं मोठं कारस्थान ती एकटी करु शकत नाही. तिच्या मागे नक्कीच कोणीतरी मास्टर माईंड आहे. कदाचित रियाने हे केवळ पैशांसाठी केलं असेल. आपल्याला रियासोबत त्या मास्टर माईंडचं देखील पितळ उघडं पाडायचं आहे.” गेल्या काही काळात कंगना रणौत सातत्याने या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आहे.

या टीव्ही अभिनेत्रीने नाकारली ‘बिग बॉस’ची कोट्यवधींची ऑफर; कारण…

सुशांत प्रकरणात आलं वेगळं वळण

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला. रियाने आजवर अमली पदार्थाचे सेवन केलेले नाही. मात्र तपासादरम्यान एनसीबीला रक्त किंवा अन्य चाचण्या आवश्यक वाटल्यास त्यासही ती तयार असल्याचे अ‍ॅड. मानेशिंदे यांनी सांगितले.

रियाच्या फोनमधून मिळवलेल्या चॅट्समध्ये ती सॅम्युअल मिरांडासोबत ड्रग्सविषयी चर्चा करत असल्याची समोर आली. रियाचे हे रिट्रीव चॅट्स असून तिने ते यापूर्वी डिलिट केले होते. यातील पहिल्या संभाषणात ती गौरव आर्यासोबत ड्रग्सविषयी बोलताना दिसत आहे. हे मेसेज ८ मार्च २०१७ चे आहेत. या चॅट्सविषयी खुलासा होताच सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने रियाविरोधात त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.