आपल्या विनोदबुद्धीने टेलिव्हिजन विश्व गाजवणारा विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ काही आठवड्यांपूर्वीच बंद झाला. सुनील ग्रोवरसोबत विमानप्रवासातील वाद त्यानंतर त्याच्या प्रसिद्ध शोचे बंद होणे या सर्व धक्क्यांमधून कपिल बाहेर पडत नाही, तोवर आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. त्याची प्रेयसी गिन्नी छत्राथ हिच्यासोबत त्याचा ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे. ‘डीएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार, कपिल आणि गिन्नीचे नाते संपुष्टात आले असून, यावर्षाअखेर होणारे त्यांचे लग्न रद्द करण्यात आले आहे.
वाचा : कंगनाच्या ‘सिमरन’मधील हिरोबद्दल या गोष्टी माहित आहेत का?
कपिलच्या टीममधील एक महिला सदस्य या ब्रेकअपमागचे कारण असल्याचे म्हटले जातेय. कपिलच्या एका जवळच्या सूत्राने सांगितले की, कपिलच्या टीममधील एक महिला सदस्य सतत त्याच्या हिताविरोधात काम करते. पण, तो तिच्याविरुद्ध अवाक्षरही ऐकण्यास तयार नाही. तो प्रचंड भावनिक असल्यामुळे आपल्या जवळची व्यक्ती धोका देत असल्याचे सत्य तो स्वीकारू शकत नाहीये. याच महिला सदस्याने स्वत: तिच्या आणि कपिलच्या लिंकअपची चर्चा घडवून आणली. आपल्या लिंकअपची चर्चा ऐकल्यानंतर कपिलने लगेच त्याच्या व गिन्नीच्या लग्नाची घोषणा केली होती. तरीही ती महिला कपिलच्या आयुष्यात ढवळाढवळ करत असून त्याच्याजवळ असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दूर करण्याचा प्रयत्न करतेय. हीच महिला कपिल आणि गिन्नीच्या ब्रेकअपला कारणीभूत असल्याचे ‘डीएनए’च्या वृत्तात म्हटले आहे.
वाचा : संजय दत्तने पूर्ण केली वडिलांची शेवटची इच्छा
गिन्नीवर असलेले प्रेम जाहीर करताना कपिलने तिच्यासोबतचा फोटो ट्विट करत लिहिले की, ‘ही माझी अर्धांगिनी आहे असे मी म्हणणार नाही. ती मला पूर्णत्व आणते असे मी म्हणेन. लव्ह यू गिन्नी…. कृपया हिचे स्वागत करा.. मी तिच्यावर खूप प्रेम करतो.’ विशेष म्हणजे, सुनिल ग्रोवरसोबत झालेला वाद उघड झाल्याच्या दिवशीच कपिलने हे ट्विट केले होते.
Will not say she is my better half .. she completes me .. love u ginni .. please welcome her .. I love her so much:) pic.twitter.com/IqB6VKauM5
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) March 18, 2017
कॉलेजच्या दिवसांपासून कपिल आणि गिन्नीची ओळख आहे. या दोघांनीही स्टॅण्ड अप कॉमेडियन म्हणून करिअरला सुरुवात केली होती. लग्नानंतर गिन्नी कपिलच्या ‘के९ प्रॉडक्शन्स’ या निर्मितीसंस्थेचे काम सांभाळणार असल्याचीही चर्चा होती.