कॉमेडियन कपिल शर्मा ‘ज्ञानम गंगा’ या एनजीओला लवकरच १०० सायकल दान करणार असल्याचे वृत्त सध्या सिनेवर्तुळात फिरत आहे. ही संस्था कमी दिसणाऱ्यांसाठी काम करते. ‘द कपिल शर्मा शो’च्या येत्या भागात या एनजीओचे काही सदस्य सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबतच कपिल सायकल दान करणार असल्याची घोषणा करणार आहे.
कतरिनापेक्षा दीपिकासोबतच रणबीरची जोडी हिट!
”ज्ञानम गंगा’ ही एनजीओ त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतेय. त्यांच्या या कार्याला माझ्याकडून ही छोटीशी मदत आहे. त्यांना आमच्या शोमध्ये बोलावणं हा माझ्यासाठी एक सन्मानच आहे. दुसऱ्यांची मनोभावे सेवा आणि काम करणाऱ्या एनजीओंना मदत करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो,’ असं कपिलने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ज्ञानम गंगा’ या संस्थेने आतापर्यंत केवळ सात दिवसांत सहा राज्यांतील ३४ गावांमध्ये १,७०० किमी अंतर कापत ७००० लोकांची मदत केली आहे. काही दिवसांपूर्वीच कपिलने त्याच्या कार्यक्रमात नेत्रदानाचाही संकल्प केला होता. विनोदासोबतच सामाजिक भान जपणाऱ्या त्याच्या या उपक्रमांमुळे तो आपल्या चाहत्यांची मनं जिंकत आहे.
काही दिवसांपूर्वी कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवरच चक्कर येऊन पडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा हे त्यांचा आगामी सिनेमा ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनसाठी शोवर येणार होते. पण कपिलची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हा कार्यक्रम रद्द करावा लागला. पण त्याने फेसबुकवर लाइव्ह जात चाहत्यांना आपली तब्येत ठीक असल्याचेही सांगितले होते.
अभिनेता दिलीप अटकेत; मल्याळम अभिनेत्रीचे अपहरण करुन लैंगिक शोषण केल्याचा आरोप
कपिलच्या तब्येतीत सुधार झाल्यानंतर या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आता शाहरुख आणि अनुष्का त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून पुन्हा एकदा कपिलच्या कार्यक्रमासाठी वेळ देणार का? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.