आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडीयन कपिल शर्मा लवकरच छोट्या पडद्यावर पतरणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’ बंद झाल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांची निराशा झालेली. त्याला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण सोनी टीव्हीवर तो परततोय.

कपिलचा ‘फिरंगी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्याच्याच प्रमोशनसाठी तो सोनी टीव्हीवर ‘फिरंगी नाइट्स’ हा कार्यक्रम घेऊन येतोय. ‘द कपिल शर्मा शो’सारखीच या कार्यक्रमाची रचना असून नवज्योत सिंग सिद्धू, कीकू शारदा आणि चंदन प्रभाकर सहभाग घेतील. तर ‘फिरंगी’ चित्रपटातील कलाकार या शोमध्ये पाहुणे म्हणून सहभागी होतील.

https://www.instagram.com/p/BROCrCyFfSj/

https://www.instagram.com/p/BbZuSy7FMlX/

कपिलशी वाद झाल्यानंतर त्याचा सहकलाकार सुनील ग्रोवरने शो सोडला. त्यानंतर सेटवर आलेल्या काही कलाकारांना त्याने ताटकळत ठेवल्यामुळे ‘कपिल शर्मा शो’चे शूटिंग रद्द होऊ लागले होते. यानंतरच सोनी वाहिनीने त्याचा शो बंद करण्याचा निर्णय घेतला होता.