बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या बर्थडे बॅशमध्ये तारे- तारकांची मांदियाळी पाहायला मिळाली. ‘केजो’च्या बर्थडे बॅशला त्याला शुभेच्छा देण्यासाठी बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ऐश्वर्या राय बच्चन, रणबीर कपूर,अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट आणि इतरही काही सेलिब्रिटी उपस्थित होते. छायाचित्रकारांना यापैकी जवळपास सर्वच कलाकारांचे फोटो काढण्याची संधी मिळाली.

वाचा : प्रेमासाठी मुस्लिम धर्म स्वीकारणारे बॉलिवूड सेलिब्रिटी

या पार्टीत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरदेखील उपस्थित होती. अनेक तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही भावी अभिनेत्री मात्र या पार्टीत एका खास व्यक्तीच्या मागे लागली होती. ‘पिंकविला’ वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, पार्टी संपेपर्यंत जान्हवी बॉलिवूडचा हॅण्डसम हंक रणबीर कपूर याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होती. पण, रणबीर मात्र ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील त्याचा सहकलाकार आदित्य रॉय कपूर आणि ‘ऐ जवानी है’ मधील अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यासोबत गप्पा मारण्यात रमला होता. रणबीरचे लक्ष वेधण्यात गुंतलेली जान्हवी यावेळी सावत्र भाऊ अर्जुन कपूरपासून चार हात दूरच राहत होती.

वाचा :  सारा अली खान- आर्यनसोबत शाहरुखचा ‘सेलिब्रेशन मोड ऑन’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनने सावत्र बहिणींशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. अर्जुन म्हणालेला की, ‘मी जान्हवी आणि खुशीला कधी भेटत नाही आणि त्यांच्यासोबत वेळही घालवत नाही. त्यांचं माझ्या आयुष्यात काहीही स्थान नाही.’ जेव्हा अर्जुनचे आई- वडील वेगळे झाले होते तेव्हा अर्जुन फक्त ११ वर्षांचा होता. त्यांच्या घटस्फोटाचा गंभीर परिणाम अर्जुनच्या आयुष्यावर पडला होता.