चित्रपट म्हटलं की मनोरंजनासोबत आपल्या आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्रीच्या मेकअपपासून ते अगदी त्यांच्या वेशभूषेपर्यंत सर्वच बाबतीत प्रेक्षकांमध्ये कुतूहल पाहायला मिळतं. त्यातही काही प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या चित्रपटांमध्ये तर कलाकारांच्या वेशभूषेवरही फार खर्च केल्याचं पाहायला मिळतं. त्यापैकीच एक प्रोडक्शन हाऊस म्हणजे ‘धर्मा’. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या प्रत्येक चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. फॅमिली ड्रामा, रोमॅण्टिक अशा विविध विभागांमध्ये केजो तिर्पट प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. ‘धर्मा प्रोडक्शन’ अंतर्गत साकारण्यात आलेल्या चित्रपटांच्या कथानक आणि संगीतासोबतच कलाकारांच्या वेशभूषेलाही प्रेक्षकांची दाद मिळवते. या कलाकारांनी वापरलेले सुरेख, डिझायनर कपडे चित्रपटानंतर नेमके कुठे जातात, हा प्रश्न अनेकांच्याच मनात घर करतो. किंबहुना त्याबद्दल बरंच कुतूहल पाहायला मिळतं.

सर्वांच्याच मनात घर करणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे ‘फिल्म कम्पॅनियन’ या वेबसाइटने. धर्मा प्रोडक्शनच्या मुंबईतील गोरेगाव येथील ऑफिसमध्ये असणाऱ्या एका गोदामात आजवर धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटांमध्ये वापरण्यात आलेले कपडे ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ‘कभी खुशी कभी गम’ मध्ये जया बच्चन यांनी नेसलेल्या साडीपासून ते ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटात आलियाने वापरलेल्या कुर्त्यापर्यंत सर्व डिझायनर कपडे जपून ठेवण्यात आले आहेत. या खोलीत बरीच कपाटं असून, त्यामध्ये कलाकारांनी वापरलेले कपडे संग्रही ठेवण्यात आले आहेत.

छाया सौजन्य- फिल्म कम्पॅनियन
छाया सौजन्य- फिल्म कम्पॅनियन
छाया सौजन्य- फिल्म कम्पॅनियन

चित्रपटात कलाकारांनी वापरलेले कपडे नंतर नेमके जातात कुठे हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत असताना खुद्द करण जोहरनेच त्याचं उत्तर दिलंय. ‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या माहितीत करण म्हणाला होता, ‘कपडे ही माझी आवडती गोष्ट आहे. मी अशा बऱ्याच गोष्टी विकत घेतो ज्यांचा मला काहीच उपयोग होत नाही. मला कोणतंही व्यसन नाही हे खरंय. पण, मी अगदी वेड्यासारखं शॉपिंग करतो.’ करणने त्याची हीच आवड एका प्रकारे जपली आहे असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या