सोशल मीडियाच्या माध्यम बरेच सेलिब्रिटी त्यांच्या आगामी चित्रपटांचे अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. मात्र पोस्ट टाकताना केलेली एखादी सामान्य चूकसुद्धा त्यांच्यासाठी महागात पडू शकते. असाच काहीसा अनुभव निर्माता- दिग्दर्शक करण जोहरलासुद्धा आला आहे. करणच्या आगामी ‘केसरी’ चित्रपटात अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका परिणीती चोप्रा साकारणार आहे. हीच घोषणा त्याने ट्विटरवर केली. पण ट्विट करताना त्याच्याकडून एक मोठी चूक झाली आणि त्यामुळे ट्विटरकरांनी त्याला ट्रोल केले.

‘केसरी’मध्ये अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका परिणीती साकारणार असल्याचे ट्विट करणने केले. पण परिणीतीच्या जागी त्याने अक्षयचाच ‘केसरी’मधील लूक असलेला फोटो पोस्ट केला. त्यामुळे अक्षयचा फोटो आणि नाव परिणीतीचं असल्याने नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी तर हास्यास्पद मीम्ससुद्धा त्या ट्विटच्या कमेंटमध्ये पोस्ट केले.

bliinkit news
एका आईची शक्ती! ब्लिंकिटला ‘ही’ गोष्ट फ्री द्यावीच लागली, स्वतः सीईओने केली पोस्ट
Who exactly is Archit Grover of Indian origin
कॅनडात सोन्याची आजवरची सर्वात मोठी फ्लिमी स्टाइल चोरी; अटकेतील भारतीय वंशाचा अर्चित ग्रोव्हर नेमका कोण?
Israel tank brigade seizes Palestinian control of the Rafah border between Egypt and Gaza forcing it to close
अमेरिकेकडून मदत थांबूनही इस्रायली रणगाडे राफामध्ये… युद्धविरामाची शक्यता मावळली? आणखी किती नरसंहार?
RBI lifts ban on BoB World Bank of Baroda mobile app restrictions
बँक ऑफ बडोदाच्या मोबाइल ॲपवरील बंधने मागे; RBI ने का केली होती कारवाई?
exact reason behind the trade war between China and Europe
चीन अन् युरोपमधील व्यापार युद्धाच्या मागे नेमके कारण काय?
loksatta analysis elon musk visits china to deals self driving
एलॉन मस्क यांच्या चीन दौऱ्याच्या केंद्रस्थानी सेल्फ ड्रायव्हिंग सॉफ्टवेअर… काय आहे ही प्रणाली? टेस्लासाठी चीन इतका महत्त्वाचा का?
dombivli kopar illegal building marathi news
डोंबिवलीतील कोपरमध्ये रस्ता बंद करून बेकायदा इमारतीची उभारणी, परिसरातील सोसायट्यांमधील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी
Kapil Asks this question to Aamir Khan
“तिसरं लग्न कधी करणार?”, कपिल शर्माच्या प्रश्नावर आमिर खानने काय दिलं उत्तर?

वाचा : आलियाचा स्टाईल मंत्रा आता पुणेकरांसाठी 

या ट्रोलमुळे अखेर करणला माफी मागावी लागली. पुन्हा नव्याने ट्विट करत करणने त्याची चूक सुधारली. ‘चित्रपटाच्या नायिकेच्या घोषणेसह केसरीचा पोस्टरही दाखवायचा होता. पण, आता परिणीती या चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल याची घोषणा पुन्हा करतो,’ असे म्हणत करणने परिणीतीचा फोटो पोस्ट केला.