बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. सध्या करीनाचे वडील ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर करोनावर उपचार घेत आहेत. दरम्यान करीनाला मुंबईतील नानावटी रुग्णालया बाहेर दिसली होती. त्यानंतर सोशल मीडियावर करीना रुग्णालयात का गेली आहे? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
रणधीर कपूर यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर करीनाने देखील करोना चाचणी करुन घेतली होती. तिच्या करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण आज अचानक करीना नानावटी रुग्णालयात पोहोचली आहे.
View this post on Instagram
करीना रुग्णालयात का गेली आहे या मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये करीनाची गाडी दिसत आहे. पण गाडीमध्ये नेमकं कोण आहे हे स्पष्ट दिसत नाही. करीना लस घेण्यासाठी किंवा मेडिकल चेकअपसाठी रुग्णालयात गेली असल्याचे म्हटले जात आहे.
काही दिवसांपूर्वी करीनाचे वडील रणधीर कपूर यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. ‘मला करोना कसा झाला याची कल्पनाच नाही. खरतर चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या घरात काम करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांची देखील करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना देखील उपचारासाठी माझ्यासोबत कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे’ असे रणधीर म्हणाले होते.