बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतो. तो आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच कुठली ना कुठली पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. यावेळी त्याने एक टिक-टॉक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. नेटकरी त्याच्या या मजेशीर व्हिडीओचा अनंद घेत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर एक लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे.
काय आहे व्हिडीओत?
या व्हिडीओमध्ये कार्तिक काळ्या रंगाचा चष्मा लावून एका मुलीकडे पाहात आहे. बराच वेळ एकटक लावून पाहाणाऱ्या कार्तिकवर ती मुलगी रागावते. व त्याला मारायला जाते. तेवढ्यात तेथे एक मुलगा येतो व कार्तिक अंध असल्याचे तिला सांगतो. असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
याआधी कार्तिक ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर जोरदार कमाई केली आहे.