विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करवा चौथचा व्रत करतात. कार्तिक महिन्याच्या चौथ्या दिवशी करवा चौथ साजरी केली जाते. पतीला दिर्घ आयुष्य लाभावे यासाठी आजच्या दिवशी पत्नी निर्जळी उपवास करतात. चंद्राचे दर्शन झाल्यानंतर पती आणि चंद्राची पूजा करून हा उपवास सोडला जातो. सामान्यांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा करवा चौथचा उपवास करतात. गेल्या वर्षी सेलिब्रिटींनी करवा चौथ कसा साजरा केला आणि आजचा करवा चौथ कोणकोणत्या सेलिब्रिटींसाठी विशेष असेल हे जाणून घेऊयात…
गेल्या वर्षी करवा चौथ साजरा करण्यासाठी श्रीदेवी, रविना टंडन, निलम कोठारी, भावना पांडे असे काही कलाकार अनिल कपूर यांच्या मुंबई इथल्या घरी जमले होते. या फोटोंमध्ये लाल रंगाची साडी आणि दागिन्यांमध्ये श्रीदेवी अत्यंत सुंदर दिसत होती. तर रविनानेही लाल रंगाचा सुरेख ड्रेस परिधान केला होता.
वाचा : जेव्हा शाहरुखला वैतागून गौरीने केला होता ब्रेकअप
एप्रिल २०१६ मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोवरशी विवाहबद्ध झालेल्या बिपाशाने गेल्या वर्षी पहिला करवा चौथ साजरा केला होता. इन्स्टाग्रामवर तिने फोटोदेखील पोस्ट केला होता. तर प्रिती झिंटानेसुद्धा गेल्या वर्षी पहिल्यांदा करवा चौथ साजरा करत सोशल मीडियावर फोटो शेअर केला होता.
नुकतंच लग्न झालेल्या आणि आजचा पहिलाच करवा चौथचा उपवास करणाऱ्या सेलिब्रिटींसाठी हा दिवश विशेष आहे. अभिनेता नील नितीन मुकेशने यावर्षी फेब्रुवारीमध्ये रुक्मिणी सहायशी लग्न केलं. रुक्मिणीचा हा पहिलाच करवा चौथ असेल. मार्चमध्ये विवाहबद्ध झालेल्या अभिनेत्री ऋषिता भट्ट, ‘एफआयआर’ फेम चंद्रमुखी चौटाला, ‘नागार्जुन’ फेम पूजा बॅनर्जी यांच्यासाठीसुद्धा हा पहिलाच करवा चौथ असेल.